Liang Wenfeng शिक्षकाच्या मुलानं उडवली अमेरिकेची झोप! AI क्रांती करणारा DeepSeek निर्माता कोण आहे?

Chinese AI chatbot DeepSeek : चायनीज AI चॅटबॉट डीपसीकने (DeepSeek) अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Chinese AI chatbot DeepSeek : चायनीज AI चॅटबॉट डीपसीकने (DeepSeek) अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये खळबळ उडवली आहे. डीपसीक लॉन्च होताच अमेरिकेतील टेक्नॉलजी कंपनीत अक्षरश: पळापळ सुरु झालीय. त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI वर आजवर मक्तेदारी असलेल्या अमेरिकन कंपन्यांना चीनच्या डीपसीकनं धक्का दिला आहे. नेस्डेक या कंपनीचे 600 अब्ज डॉलर काही मिनिटामध्येच स्वाहा झाले. तंत्रज्ञान क्षेत्रात ही अभूतपूर्व क्रांती करणाऱ्या तरुणाचं नाव आहे लियांग वेनफेंग (Liang Wenfeng). हा लियांग कोण आहे? याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण आहे लियांग वेनफेंग?

चीनी AI डेव्हलपर डीप सिकचा लियांग वेनफेंग या 40 वर्षाच्या व्यक्तीनं बनवले आहेत. ते डीपसीकचे संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांच्या निर्मितीनं OpenAI च्या चॅटजीपीटीला मागं टाकलं आहे. लियांग यांचा जन्म चीनमधील झानजियांग राज्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते.

लियांग सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांना सतत नवं शिक्षण घेण्याचा ध्यास होत. शाळेतील दिवसापासूनच ते नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत. त्यांना ज्या गोष्टीचा त्रास होत असे त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न ते करत.

Advertisement

लियांग याचं शिक्षण किती?

चीनमधील झोजियांग विद्यापीठातून 2007 साली त्यांनी IT इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. 
2010 साली त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान इंजिनिअरिंगमध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले.
लियांग यांनी रिसर्च मॅनेजमेंटच्या दरम्यान टार्गेट ट्रॅकिंग अल्गोरिदम शोधले. त्याचा कमी खर्चातील PTZ कॅमेऱ्यात वापर केला जातो. 

लियांग यांनी स्थापन केलेल्या कंपन्या

पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर AI शी संबंधित अनेक कंपन्यांची स्थापना केली.
2013 साली हांग्जो याकेबी इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली.
2015 साली झोजियांग जियुझांग अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली.
2019 साली हाय-फ्लायर AI लॉन्च केले.
2023 साली डीपसीक कंपनीची स्थापना केली. ही कंपनी AGI डेव्हलप करण्याचं काम करते.

Advertisement

( नक्की वाचा : चीनच्या DeepSeek ने जगभरातील टेक कंपन्यांची उडवली झोप; अमेरिकन शेअर बाजारावर परिणाम )
 

सर्वांचा चुकवला अंदाज

आम्ही त्याला पहिल्यांदा भेटोल त्यावेळी  एक विचित्र केशरचना असलेला तरुण अशी त्याची पहिली प्रतिमा आमच्या मनात निर्माण झाली होती. आम्ही त्याला गांभीर्यानं घेतलं नव्हतं, असं लियांग यांच्या व्यावसायिक भागिदारानं फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत  सांगितलं. त्याला त्याचं व्हिजन नीट मांडता आलं नव्हतं. संपूर्ण जग बदलणारी यंत्रणा मला उभी करायची आहे, इतकंच तो म्हणत होता. आम्हाला बाईट डान्स किंवा अलीबाबा सारख्या मोठ्या कंपन्याच हे करु शकतील असं वाटत होतं,' असं या व्यक्तीनं सांगितलं. 

लियांग यांनी त्यांच्या भागिदारापासून सर्वांचेच अंदाज चुकवले असल्याचं आता सिद्ध झाले आहे. 
 

Topics mentioned in this article