Rahul Gandhi Meet Ilhan Omar : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा वादात सापडला आहे. आरक्षण, शीख धर्मियांबाबत त्यांच्या वक्तव्यावरुन देशात वाद सुरु झाला आहे. त्यातच त्यांनी भारतच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या अमेरिकन खासदार इल्हान ओमर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे खळबळ उडालीय. राहुल आणि ओमर यांच्या भेटीचे काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे फोटो प्रसिद्ध होताच भाजपानं त्यांच्यावर जोरदार टीका केलीय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत इल्हान ओमर?
- इल्हान ओमर या अमेरिकन खासदार आणि सत्तारुढ डेमॉक्रेटिक पक्षाच्या नेत्या आहेत.
- त्या आफ्रिकन निर्वासित असून त्यांनी अमेरिकेतील निवडणुकीत विजय मिळवला होता.
- काश्मीर आणि खलिस्तान या स्वतंत्र देशांच्या मागणीला ओमर यांनी नेहमी पाठिंबा दिला आहे.
- ओमर यांनी 2022 साली पाकव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता.
- अमेरिकेतील एका रिपोर्टनुसार या दौऱ्याला पाकिस्ताननं फंडिंग केले होते.
- ओमर नेहमीच भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखल्या जातात.
- पंतप्रधान मोदींनी अमेरिकन सिनेटमध्ये केलेल्या भाषणावर त्यांनी बहिष्कार टाकला होता.
- इस्रायलला विरोध करणाऱ्या अमेरिकन संसदेमधील दोन मुस्लीम महिलांमध्ये त्यांचा समावेश होतो.
- इस्रायल विरोधी वक्तव्य केल्याबद्दल त्यांना विदेश समितीमधून काढून टाकण्यात आलं होतं.
( नक्की वाचा : राहुल गांधींची अमेरिकेतून RSS वर वादग्रस्त टीका, भाजपानं दिला इंदिरा गांधींचा दाखला... प्रकरण काय? )
सख्ख्या भावाशी लग्नाचा आरोप
अमेरिकेतील मागील अध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इल्हान ओमर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी एका सभेत न्याय विभागानं चौकशी करावी अशी मागणी केली होती. ओमर यांनी त्यांच्या सख्ख्या भावाशी लग्न केलं आणि बेकायदेशीर पद्धतीनं अमेरिकेत स्थायिक झाल्या असा आरोपही ट्रम्प यांनी केला होता.
इल्हान ओमर आपल्या देशाचा द्वेष करतात. ज्या भागात सरकार नाही तिथून त्या आल्या आहेत आणि आता आपल्याला देश कसा चालवायचा हे सांगत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.
भाजपानं केली टीका
भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी या भेटीवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी आहेत, असा आरोप त्यांनी केला. भारतविरोधी बोलणाऱ्या भारताच्या विरोधात अभियान करणाऱ्यांची राहुल गांधी भेट घेत असल्याची टीका त्यांनी केली.