Kristin Cabot : प्रसिद्ध कंपनीच्या CEO सोबत Live रोमान्स करताना सापडलेल्या क्रिस्टिन कॅबोट कोण आहेत?

Andy Byron Kristin Cabot: ॲस्ट्रॉनॉमर (Astronomer) कंपनीचे सीईओ अँडी बायर्न हे बोस्टन येथील कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये त्यांच्या कंपनीतील सहकारी क्रिस्टिन कॅबोट यांच्यासोबत उपस्थित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kristin Cabot: अँडी बायर्न यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसलेल्या क्रिस्टिन कॅबोट या कोण आहेत?
मुंबई:


Andy Byron Kristin Cabot: प्रसिद्ध हॉलिवूड रॉक बँड कोल्डप्लेच्या बोस्टन येथील कॉन्सर्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कंपनीच्या सीईओचे अफेअर उघड झालं आहे. 

ॲस्ट्रॉनॉमर (Astronomer) कंपनीचे सीईओ अँडी बायर्न हे बोस्टन येथील कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये त्यांच्या कंपनीतील सहकारी क्रिस्टिन कॅबोट यांच्यासोबत उपस्थित होते. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसले, ज्यामुळे त्यांच्या कथित अफेअरचा खुलासा झाला आहे. या घटनेनंतर कॉन्सर्टचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. विशेषत:  अँडी बायर्न यांच्यासोबत व्हिडिओमध्ये दिसलेल्या क्रिस्टिन कॅबोट या कोण आहेत? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

क्रिस्टिन कॅबोट कोण आहेत?

क्रिस्टिन कॅबोट या ॲस्ट्रॉनॉमर (Astronomer) या टेक कंपनीच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी (Chief Public Officer) आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील बोस्टनमध्ये झाला. त्यांनी गेटिसबर्ग कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये त्या ॲस्ट्रॉनॉमर कंपनीत दाखल झाल्या. 

( नक्की वाचा : 'माझ्या ब्लाऊजमध्ये हात घातला आणि...' अभिनेत्रीचा पुजाऱ्यावर गंभीर आरोप! )

क्रिस्टिन कॅबोट यांचे करिअर

कॅबोट यांनी 2000 मध्ये त्यांनी 'द स्क्रीन हाऊस'मध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली. अनेक संस्थांमध्ये काही काळ काम केल्यानंतर, 2004 मध्ये त्या 'डिजिटासएलबी' (DigitasLBi) मध्ये रुजू झाल्या. तिथं त्यांनी असोसिएट डायरेक्टर आणि यूएस टॅलेंट ऑपरेशन्स आणि रिक्रूटिंगच्या प्रमुख म्हणून काम केले. त्यानंतर, ॲस्ट्रॉनॉमरमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी अनेक संस्थांमध्ये ग्लोबल टॅलेंट मॅनेजमेंट (Global Talent Management) प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.

Advertisement

कॅबोट स्वतःचं एक उत्तम नेत्या (passionate people leader) म्हणून वर्णन करतात. वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी सुरुवातीपासूनच विनिंग कल्चर  निर्माण करण्यासाठी त्या ओळखल्या जातात, असे त्यांच्या लिंक्डइन बायोमध्ये म्हटले आहे.

कॅबोट यांचे खासगी आयुष्य

कॅबोट यांचे यापूर्वी केनेथ सी. थॉर्नबी यांच्याशी लग्न झाले होते. त्यांनी 2018 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांचा विवाह 2022 मध्ये अधिकृतपणे संपुष्टात आला.

Advertisement

ॲस्ट्रॉनॉमरचे सीईओ अँडी बायर्न यांनी एकदा आता डिलीट केलेल्या लिंक्डइन पोस्टमध्येही केनेथ यांच्या नेतृत्वकौशल्याची जोरदार प्रशंसा केली होती. 
 

Topics mentioned in this article