या जगात कधी, काय होईल याचा नेम नाही. तसंच कोणाचा जीव कोणावर येईल याचाही नेम नाही. एका तरुणीचा प्रेमविवाह झाला. अवघ्या 17 वर्षांची असताना ती गर्भवती राहिली होती, ज्यामुळे तिचा वयाच्या 18 व्या वर्षी विवाह लावून देण्यात आला. तरुण वयात झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे तरुणीच्या आईवडिलांनी नवदाम्पत्याला त्यांच्या घरात राहण्यास जागा दिली. मात्र ते म्हणतात ना पाहुण्याला दिसली ओसरी, पाहुणा हातपाय पसरी तोच प्रकार या तरुणीसोबत झाला. हे सगळे प्रकार कळण्यास या तरुणीला आणि तिच्या घरच्यांना 22 वर्ष लागली. नेमकं काय झालं, पाहूया.
नवदाम्पत्यासाठी तरुणीच्या वडिलांनी त्यांच्या घराजवळच एक घर घेऊन दिलं. पुढची 20-22 वर्ष या दोघांचा संसार छान सुरू होता. एकेदिवशी ही तरुणी तिच्या मित्र मैत्रीणींसोबत फिरायला गेली होती. तिथून ती जेव्हा परत आली तेव्हा तिला तिचा नवरा आणि तिची आई आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. हे दृश्य पाहून या तरुणीला जबरदस्त धक्का बसला. ही तरुणी जबरदस्त संतापली होती, तिने तिच्या नवऱ्याला आणि आईला फैलावर घेतले. यावेळी तिला कळालं की तिच्या नवऱ्याचं त्याच्या सासूसोबत गेली 22 वर्ष अफेअर सुरू होतं. तरुणीचं लग्न होण्याच्या आधीपासूनच दोघांचं गुटर्रगूं सुरू झालं होतं. या महिलेला आणखी एक संशय आला होता, जो तिच्या दुर्दैवाने खरा ठरला.
नक्की वाचा :तमन्ना म्हैसूर सँडल साबणाची झाली ब्रँड ॲम्बेसेडर, पण कर्नाटकात उफाळला वाद, कारण काय?
या महिलेने दोघांना जाब विचारला की तिच्या आईला झालेली जुळी मुलं आणि सगळ्यात लहान मुलगा ही कोणाची मुलं आहेत ? उत्तरासाठी टाळाटाळ झाल्यानंतर DNA टेस्ट करवण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून निष्पन्न झालं की या तरुणीनंतर तिच्या आईला झालेली तीनही मुलं ही तरुणीच्या नवऱ्यापासून झालेली आहेत.
नक्की वाचा :पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं घेतलं आफ्रिदीचं चुंबन, इम्रान खानची अवस्था विसरला 'लाला'!
हा सगळा प्रकार झाल्यानंतर तरुणीने नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तरुणीच्या वडिलांनी तिच्या आईला घराबाहेर काढलं. Reddit वरील एका मंचावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान या तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे.