पैसे असले की सर्व काही मिळालं असं म्हणतात. तशी धारणा काही लोकांची असते. पण पैसे हेच सर्व काही असतं का हा खरा प्रश्न आहे. त्याचा अनेकांना अनेकवेळा अनुभव येतो. असाच एक अनुभव एका महिलेला आला आहे. तिने आपल्या मनातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत मनाची वाट मोकळी केली आहे. विशेष म्हणजे या महिलेचा पगार तुम्ही ऐकला तर तुमचे डोळे फिरतील. तीला तब्बल 40 लाख पगार आहे. हा तिचा वार्षीक पगार आहे. पण येवढा पगार मिळूनही ती समाधानी नाही. ऐवढचं काय तर ती रोज रडत असते. असं तिच्या सोबत का होत आहे हे तिनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून स्पष्ट पणे सांगितलं आहे.
ज्या महिनेनं ही पोस्ट केली आहे तिचं वय 34 वर्ष आहे. या महिलेला दरवर्षी सुमारे 40 लाख रुपये पगार मिळतो. ती इतकं कमवते, पण आता ती इतकी थकली आहे की कामावर जाण्यापूर्वी ती दररोज रडते. तिने रेडिटवर हा अनुभव शेअर करत अनेक खुलासे केले आहेत. ती म्हणते की मी एनालिटीक लीड म्हणून काम करते. 12 वर्षे सतत काम करत आली आहे. , तिला सध्या चांगला पगार मिळत आहे. परंतु जिवनात बिलकुल समाधान नाही. मानसिक आणि शारीरिक थकवा आला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. ती तिन ते चार महिन्यांचा करिअर ब्रेक घेण्याचा विचार करत आहे. शिवाय त्यानंतर परत एकदा नवीन सुरूवात करण्याचं ही तिने ठरवलं आहे. असं असलं तरी अनेक प्रश्न तिला आतापासूनच खात आहेत.
नक्की वाचा - Mhada News: म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार, नव्या किंमत ऐकून तुम्ही ही व्हाल आवाक
ही महिला आपल्या पोस्टमध्ये म्हणते की मी कामावर जाण्यापूर्वी रोज खूप रडते. मला असं वाटतं की, मी आता हे कधीच सहन करू शकणार नाही. ती पुढे असं ही सांगते की कामाचा दबाव इतका वाढला आहे की त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होत आहे. त्यातूनच मानसिक थकवा, झोपेचा अभाव आणि भावनिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याच तिला आता सतत त्रास ही होवू लागला आहे. या महिलेला काही महिने सुट्टी घ्यायची आहे. तसं तिने बोलून ही दाखवलं आहे. सुट्टी घेतल्यानंत पुन्हा जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तिला नोकरी शोधायला सुरुवात करायची आहे. नवी सुरूवात करायची आहे. पण सध्या ती मोठ्या ब्रेकचा विचार करत आहे.
असं असताना तिला सर्वात मोठी भीती ही आहे की, जर ती काही महिने कामापासून दूर राहिली तर तिला पुन्हा तोच पगार मिळेल का? तेच पद मिळेल का? शिवाय तिच्याकडे सध्या काही बचत केलेले पैसे आहे. त्यातून पुढील सहा महिने ती चांगले जिवन जगू शकेल. पण ब्रेक घेतल्यानंतर करिअरचं काय असा ही प्रश्न तिला सतावत आहे. महिलेच्या या पोस्टवर अनेकांनी आपली मतं दिली आहेत. मानसिक आरोग्य सर्वात आधी येतं आणि पैसा नंतर येतो असं काही जण म्हटले आहे. काहींनी तिला खर्च कमी करण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जण तिला विश्वांतीचा सल्ला ही देत आहे.