पॉक पुक आवाजामुळे लक्ष गेले, एका घावात गुप्तांग छाटले; महिलेला अटक

मृत्यूमुखी पडलेला नवरा 37 वर्षांचा होता, असे स्थानिकांनी सांगितले आहे. त्याच्या बायकोबाबत मात्र फार माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

ब्राझीलमधील अक्रेलँडिया येथील एका महिलेने आपल्या पतीचे गुप्तांग छाटून ते भाजीत घालून शिजवल्याचा आणि नंतर ते खाल्ल्याचा भयंकर प्रकार घडला आहे.  संतापाच्या भरात या महिलेने हे भयंकर कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे तिचा नवरा जागीच ठार झाला होता. नवरा मेल्याचे कळाल्यानंतर बायकोने भाजी शिजवून खाल्ली होती. नवरा अश्लील व्हिडीओ पाहात असल्याचे त्याच्या बायकोला कळाले होते, ज्यामुळे तिचा संताप अनावर झाला होता. यातूनच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.  

मृत्यूमुखी पडलेला नवरा 37 वर्षांचा होता, असे स्थानिकांनी सांगितले आहे. त्याच्या बायकोबाबत मात्र फार माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरा अश्लील व्हिडीओ पाहात असल्याचं दिसल्याने बायकोचं टाळकं फिरलं होतं. संतापाचा उद्रेक झाल्याने तिने जागच्या जागी नवऱ्याला धडा शिकवायचं ठरवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे जोडपं जिथे राहात होतं, तिथून काही अंतरावरच मृतदेह सापडला होता. गुप्तांग छाटलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. मृत व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी नोंदवली होती. पोलिसांनी बेपत्ता नागरिकांची माहिती पडताळून पाहिली असता मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली. साहजिकच आहे की,  पोलिसांनी सगळ्यात पहिले बायकोची चौकशी केली, ज्यात बायकोने आपणच नवऱ्याला ठार मारल्याचे कबूल केले.  

Advertisement

या महिलेने पोलिसांना दिलेली माहिती फारच धक्कादायक होती. तिने सांगितले की नवऱ्याचे गुप्तांग छाटल्यानंतर तिने ते भाजीत घालून शिजवले आणि खाल्ले. या कृत्यात ती एकटी होती का तिला आणखी कोणी मदत केली हे मात्र कळू शकलेलं नाही.  ही भयंकर घटना उजेडात येण्यापूर्वी ब्राझीलमध्येच काही दिवसांपूर्वी जोसेफा लिमा डी सौसा या महिलेला अटक करण्यात आली होती. सेटल्सो मार्क्स फरेरा (वय 60 वर्षे) याची हत्या केल्याचा जोसेफावर आरोप आहे. मार्च महिन्यात साओ पाउलोपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या पेरुइबे बीच रिसॉर्टमधील एका चौकात गुप्तांग आणि हृदयाचा भाग सापडला होता. या सोबत रक्ताने माखलेली एक चिठ्ठीही होती.  सेटल्सो हा लहान मुलांचे लैंगिक शोषण करत होता हे कळाल्याने त्याला हाल हाल करून ठार मारायचा असा निर्धार जोसेफाने केला होता. 
 

Advertisement
Topics mentioned in this article