महाराष्ट्र नाही, तर 'या' देशात आहे जगातील सर्वात उंच गणपतीची मूर्ती, दररोज लाखो पर्यटक घेतात दर्शन

पण तुम्हाला माहित आहे का, बाप्पाची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही, तर दुसऱ्या देशात आहे. चला, त्याबद्दल जाणून घेऊया.

जाहिरात
Read Time: 3 mins

भारतात गणपतीची अनेक मंदिरं आहेत. तिथे त्यांच्या अतिशय सुंदर मूर्ती आहेत. या मूर्तींच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची गर्दी होते. पण आम्ही तुम्हाला जगातील सर्वात उंच गणेश मूर्तीबद्दल सांगणार आहोत. मुंबईतील लालबागच्या राजाची गणेशमूर्ती खूप प्रसिद्ध आहे. ज्याची उंची 18 ते 20 फूट म्हणजे जवळपास सुमारे 5- मीटर असते. पण तुम्हाला माहित आहे का, बाप्पाची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही, तर दुसऱ्या देशात आहे. चला, त्याबद्दल जाणून घेऊया.

थायलंडमध्ये आहे गणेशाची सर्वात उंच मूर्ती 

गणपतीची सर्वात उंच मूर्ती भारतात नाही. तर थायलंड या देशा मध्ये आहे. या मूर्तीची उंची 39 मीटर आहे. ही मूर्ती खलोंग खुएन गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये आहे. देश-विदेशातून पर्यटक ही मूर्ती पाहण्यासाठी येतात. 39 मीटर उंच असलेली ही उभी गणेश मूर्ती चार वर्षांच्या बांधकाम नंतर 2012 मध्ये पूर्ण झाली.854 कांस्य तुकड्यांपासून बनलेली आणि 40,000 चौरस मीटरमध्ये पसरलेली ही मूर्ती बंग पाकोंग नदीच्या वर भव्यतेने उभी आहे. ती रस्ता आणि नदी दोन्ही बाजूने येणाऱ्या प्रवाशांना दिसते. तिच्या प्रचंड आकारामुळे चाचोएंगसाओ प्रदेश (Chachoengsao Region) खूप प्रसिद्ध झाला आहे. ज्यामुळे येथे नेहमी पर्यटक येतात.

भगवान गणेशाची मूर्ती खूपच खास 
थायलंडमध्ये असलेली भगवान गणेशाची ही मूर्ती खूपच खास आहे. या मूर्तीचे शिल्पकार पिटक चालेमलाओ आहेत. त्यांनी सांगितलं की, गणेशाची ही मूर्ती थायलंडची धार्मिक समृद्धी लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे. देवाच्या चार हातांमध्ये ऊस, फणस, केळी आणि आंबे आहेत. जे विकास आणि आशीर्वादाचं प्रतीक आहेत. त्यांचं पुढे टाकलेलं पाऊल देशाच्या प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. तर कमळाचं मुकुट ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याचप्रमाणे, सर्वात वर ॐ हे पवित्र चिन्ह संरक्षकाच्या रूपात दाखवलं आहे.

  • गणेशाची सर्वात उंच मूर्ती पाहण्याची वेळ 
  • वेळ: सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत.
  • ठिकाण: 62 मू 4, बंगतळाद, खलोंग खुएन, चाचोएंगसाओ, थायलंड.
  • प्रवेश शुल्क: परदेशी लोकांसाठी प्रति व्यक्ती 100 THB (भारतीय रुपयांमध्ये 240 रुपये), तर थाई नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

थायलंडची सर्वात उंच गणेश मूर्ती पाहण्यासाठी सर्वोत्तम वेळ 

जर तुम्ही थायलंडची सर्वात उंच गणेश मूर्ती पाहण्याचा विचार करत असाल, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ सर्वात उत्तम मानला जातो. कारण या काळात थायलंडमधील हवामान खूप आल्हाददायक असतं.

Advertisement

थायलंडच्या सर्वात उंच गणेश मूर्तीपर्यंत कसं पोहोचाल? 

सर्वात आधी तुम्हाला थायलंडला जावं लागेल. त्यानंतर चाचोएंगसाओसाठी निघावं लागेल. चाचोएंगसाओ हे बँकॉकपासून 80 किलोमीटर पूर्वेला आहे. त्यामुळे, इथे चांगल्या प्रकारे फिरण्यासाठी तुम्हाला एक पूर्ण दिवस काढावा लागेल.चाचोएंगसाओला पोहोचल्यावर तुम्हाला खलोंग खुएन गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये जावं लागेल. इथेच ही मूर्ती आहे. चला, चाचोएंगसाओला पोहोचण्यासाठी कोणते पर्याय आहेत ते जाणून घेऊया.

ट्रेनने: बँकॉकच्या हुआ लाम्फोंग स्टेशनवरून चाचोएंगसाओ जंक्शनपर्यंत नियमित ट्रेन जातात. तिथे पोहोचायला सुमारे दीड ते दोन तास लागतात. स्टेशनवरून पार्कला जाण्यासाठी तुम्ही स्थानिक टॅक्सी किंवा टुक-टुक घेऊ शकता.

Advertisement

रस्त्याने: बँकॉकच्या एक्कामाई आणि मो चिट टर्मिनल्समधून चाचोएंगसाओसाठी बसेस नेहमी सुरू असतात. त्या तुम्हाला साधारणपणे दीड तासात चाचोएंगसाओला पोहोचवतील. त्यानंतर तुम्ही पार्कपर्यंत जाण्यासाठी टॅक्सी किंवा टुक-टुक घेऊ शकता.

कार/टॅक्सीने: मध्य बँकॉकवरून गाडी चालवून किंवा टॅक्सी भाड्याने घेऊन चाचोएंगसाओला पोहोचायला 1.5 ते 2 तास लागू शकतात.