जाहिरात
Story ProgressBack

30 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याची लेक दिसते इतकी सुंदर, लुकवर चाहते फिदा

Raj Kiran: प्रमुख भूमिकांपासून ते नकारात्मक पात्र देखील अतिशय प्रभावीपणे साकारणारा अभिनेता एकेदिवशी अचानक गायब झाला. 30 वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या बॉलिवूडमधील याच अभिनेत्याच्या लेकीची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काय यामागील कारण? वाचा सविस्तर...

Read Time: 2 min
30 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याची लेक दिसते इतकी सुंदर, लुकवर चाहते फिदा
बेपत्ता असलेल्या अभिनेत्याच्या लेकीचा फोटो व्हायरल

Raj Kiran: साधाभोळा चेहरा, बोलके डोळे, थेट हृदयाला स्पर्श करणारा अप्रतिम अभिनय अशा या प्रतिभावंत अभिनेत्याने 80च्या दशकामध्ये बॉलिवूड गाजवले होते. पण अचानक या अभिनेत्याचे रुपेरी पडद्यावर दिसणे बंद झाले. तब्बल 30 वर्षांनंतर आजही हा अभिनेता बेपत्ताच आहे. मंडळींनो! अगदी बरोबर ओळखले. आपण अभिनेते राज किरण यांच्याबाबत चर्चा करत आहोत. राज किरण यांनी आपल्या दमदार अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर राज्य केले. 80च्या दशकामध्ये राज किरण यांनी सिनेसृष्टीतील कित्येक बड्या कलाकारांसोबत तसेच मोठमोठ्या बॅनरसह काम केले. मोठ्या पडद्यावर त्यांनी प्रमुख भूमिकांसह नकारात्मक पात्रही उत्तमरित्या साकारले. त्यांच्या प्रत्येक भूमिकेस चाहत्यांनी भरभरून प्रतिसादही दिला. पण एकेदिवशी राज किरण मोठ्या पडद्यावर दिसेनासे झाले. केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीतूनच नव्हे तर ते घरातूनही गायब झाले. राज किरण कुठे आहेत? काय करत आहेत? अशा भल्यामोठ्या प्रश्नचिन्हांसह त्यांच्याबाबत अफवाही पसरत होत्या. यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर त्यांच्या मुलीला सर्वांसमोर यावे लागले. 

राज किरण यांची लेक काय काम करते?

Latest and Breaking News on NDTV

एकेकाळी आपल्या शानदार अभिनयामुळे प्रसिद्धीच्या झोतात असतानाही राज किरण यांनी आपले कौटुंबिक जीवन कधीही जगासमोर आणले नाही. ते बेपत्ता झाल्यानंतरही त्यांचे कुटुंबीय कधीही लोकांसमोर आले नाही. पण जेव्हा त्यांच्याशी संबंधित अफवा मोठ्या प्रमाणात पसरू लागल्या, तेव्हा स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांच्या लेकीला सर्वांसमोर यावे लागले. राज किरण यांच्या मुलीचे नाव ऋषिका महतानी आहे. ऋषिका महतानीने करिअर करण्यासाठी ज्वेलरी डिझाइनिंग या क्षेत्राची निवड केली. ती एक ब्लॉगर देखील आहे आणि सोशल मीडियावर सक्रियही असते. ऋषिका महतानी दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक आहे. ऋषिका आपल्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. 

राज किरण यांच्याबाबत पसरल्या होत्या या अफवा 

राज किरण जवळपास 30 वर्षांपासून बेपत्ता आहेत. ते न्यूयॉर्कमधून अचानक गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांनी पोलीस तसेच खासगी गुप्तहेरांचीही मदत घेतली, पण राज यांच्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यांच्या मुलीच्या म्हणण्यानुसार, राज किरण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते आणि नैराश्यामध्येही होते. पत्नी आणि भावाने राज किरण यांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण प्रयत्नांना यश मिळाले नाही. काही दिवसांनंतर ते अटलांटामधील एका आश्रयामध्ये राहत आहेत तसेच कोणत्यातरी देशामध्ये रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत आहेत; अशा स्वरुपाच्या अफवा पसरू लागल्या. अशा वृत्तांवर पूर्णविराम देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना सर्वांसमोर यावे लागले होते. 

आणखी वाचा

गोळीबाराच्या वेळेस सलमान खान घरातच होता, लॉरेन्स बिश्नोई टोळीवर संशय

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, पोलिसांनी वाढवली सुरक्षा

अक्षय कुमारच्या नावावर फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी घातल्या बेड्या

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination