जाहिरात
Story ProgressBack

विकी-विद्याचा तो वाला व्हिडीओ पाहिला का? Rajkummar Rao आणि Tripti Dimriचा रोमान्स

Vicky Vidya Ka Woh Wala Video: राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या 'विकी-विद्या का वो वाला वीडियो' या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाच्या निमित्ताने राजकुमार राव- तृप्ती जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. राजकुमारने सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Read Time: 2 min
विकी-विद्याचा तो वाला व्हिडीओ पाहिला का? Rajkummar Rao आणि Tripti Dimriचा रोमान्स

Vicky Vidya Ka Woh Wala Video : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. राजकुमार आणि तृप्तीची फ्रेश जोडी 'विकी-विद्या का वो वाला वीडियो' (Vicky Vidya Ka Woh Wala) या आगामी सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे शूटिंग देखील पूर्ण झाले आहे. यादरम्यान 'हमारा डान्स व्हिडीओ' असे कॅप्शन देत सिनेमाच्या सेटवरील गंमतीशीवर व्हिडीओ राजकुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.   

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज शांडिल्य दिग्दर्शित 'विक्की विद्या का वो वाला वीडियो' सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. तसेच सिनेमाचे पहिले पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते आणि आता सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्याचीही माहिती समोर आली आहे. चित्रपट मध्ये राजकुमार विकीची तर तृप्ती विद्याची भूमिका निभावत आहे.

(नक्की वाचा: हे बेबी फेम क्युट Angel 17 वर्षांनंतर दिसते अशी, गालावरच्या खळीवर चाहते फिदा)

राजकुमार-तृप्तीचा रोमान्स 

राजकुमारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विकी-विद्या म्हणजेच राजकुमार-तृप्ती नदीकिनाऱ्याशेजारी डान्स-मजामस्ती करताना दिसत आहेत. लाल रंगाच्या साडीमध्ये तृप्ती अतिशय सुंदर दिसत आहे तर राजकुमारने पिवळ्या रंगाचा कुर्ता - पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे, ज्यामुळे त्याला कुल लुक मिळालाय. 

(नक्की वाचा: सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी)

प्रेक्षकांना आवडली राजकुमार-तृप्तीची जोडी  

राजकुमारने शेअर केलेल्या या गंमतीशीर व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशीनं कमेंटबॉक्समध्ये 'लव्ह' असे लिहिले आहे, तर एका युजरने '90च्या दशकातील प्रीवेडिंग शूट' अशी भन्नाट कमेंट केली आहे. चाहत्यांच्या एकापेक्षा एक कमेंट्स पाहून त्यांना तृप्ती-राजकुमारची जोडी प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. 11 ऑक्टोबर 2024 रोजी बॉक्सऑफिसवर हा सिनेमा झळकणार आहे. 

VIDEO: मुंबईच्या लोकल प्रवासामध्ये काय घडतंय? पाहा...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination