जाहिरात
Story ProgressBack

आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका?

Who is LSG owner Sanjiv Goenka: लखनौ सुपर जायटंसचे मालक संजीव गोयंका हे भर मैदानात केएल राहुलवर चिडलेले दिसले. त्यांनी लखनौच्या लाजीरवाण्या पराभवाचा संताप राहुलवर काढला. 

Read Time: 3 min
आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका?
Sanjiv Goenka : संजीव गोयंका हे लखनौ सुपर जायंट्सचे मालक आहेत.
मुंबई:

Who is LSG owner Sanjiv Goenka: आयपीएल 2024 मध्ये बुधवारी (8 मे) मैदानात आणि मैदानाबाहेर जे घडलं ते आजवर क्वचितच झालं असेल. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड या सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) सलामी जोडीनं वादळी बॅटिंग केली. त्यांनी लखनौ सुपर जायंट्सनं (LSG) दिलेलं 167 रनचं लक्ष्य फक्त 9.4 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. या मॅचनंतर जे दिसलं त्याची कुणीही कल्पना केली नसेल. लखनौ सुपर जायटंसचे मालक संजीव गोयंका हे भर मैदानात केएल राहुलवर चिडलेले दिसले. त्यांनी लखनौच्या लाजीरवाण्या पराभवाचा संताप राहुलवर काढला. 

कोण आहेत संजीव गोयंका?

लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. त्यांची कंपनी RP-संजीव गोयंका ग्रुपनं ऑक्टोबर 2021 मध्ये 7,090 कोटींची बोली लावून लखनौ सुपर जायंट्सची फ्रँचायझी खरेदी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सनं 2022 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं. हा या टीमचा तिसरा सिझन आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

RP-संजीव ग्रुपच्या साईटवरील सध्याच्या माहितीनुसार हा ग्रुप वीज आणि ऊर्जा, कार्बन ब्लॅक विनिर्माण, माहिती आणि तंत्रज्ञान संबंधी सेवा, फएमसीजी, मीडिया आणि मनोरंजन आणि कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. या ग्रुपमध्ये 23 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. त्यामध्ये जवळपास 44500 कर्मचारी काम करतात. संजीव गोयंका 2011 पासून या कंपनीचे संचालक आहेत. एटीएके या फुटबॉल टीमचे देखील गोयंका मालक आहेत. संजीव गोयंका ग्रुपकडं 4.3 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असून लाखो शेअरहोल्डर आहेत. 

संजीव गोयंका यांचा जन्म 1961 साली झालाय. ते आरपी-संजीन गोयंका समुहाचे मानद संचालक राम प्रसाद गोयंका यांचे लहान चिरंजीव आहेत. आरपी गोयंका यांनी 1979 साली फिलिप्स कार्बन ब्लॅक, एशियन केबल्स, अगरपारा ज्यूट आणि मर्फी इंडिया यांच्यासोबत आरपीजी एंटरप्राइजेची स्थापना केली होती. 

( नक्की वाचा : Video : पाकिस्तानी क्रिकेटमध्ये भूकंप, 2 सिनिअर खेळाडूंमध्ये जोरदार भांडण? )
 

धोनीला हटवलं

गोयंका यांनी 2017 मध्ये महेंद्रसिंह धोनीला रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीमच्या कॅप्टन पदावरुन हटवलं होतं. धोनीवर पहिल्यांदाचा कॅप्टनपदावरुन हकालपट्टी होण्याची नामुश्की ओढावली होती. यापूर्वी धोनीनं भारतीय क्रिकेट टीमचं कर्णधारपद स्वत:हून सोडलं होतं. चेन्नई सुपर किंग्सवर बंदी असल्यानं तो रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळत होता. गोयंकानं धोनीला काढून स्टीव्ह स्मिथची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली होती.

गोयंका यांनी त्यावेळी पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत धोनीला हटवल्याचा खुलासा केला होता. 'धोनीनं कर्णधारपद सोडलेलं नाही. आम्ही आगामी सिझनसाठी स्टिव्ह स्मिथची कॅप्टन म्हणून नियुक्ती केलीय. खरं सांगायचं तर मागील सिझन आमच्यासाठी चांगला नव्हता. आता एखाद्या तरुण खेळाडूनं टीमचं नेतृत्व करावं आणि आगामी सिझनमध्ये टीमला नवं रुप द्यावं अशी आमची इच्छा होती.'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination