Babar Azam Imad Wasim Fight: टी20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय. पाकिस्तानची टीम सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. 3 टी20 इंटरनॅशनलच्या सीरिजसाठी सध्या पाकिस्तानचे खेळाडू सराव करतायत. त्याचवेळी टीममधील मतभेद दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आझम अन्य खेळाडूंसह मैदानात उभा आहे. त्याचवेळी बाबर आणि इमाद वासिम यांच्यात कोणत्यातरी मुद्यावरुन वाद सुरु होतो. हा वाद इतका वाढतो की इमाद आक्रमक झालेला दिसतोय. इमाद काही चुकीचं करणार इतक्यात फास्ट बॉलर नासिम शाहनं मध्यस्थी केली. तो इमादचा हात पकडून त्याला काहीतरी समजावत असल्याचं व्हिडिओतून स्पष्ट होतंय.
What happened between Babar Azam and Imad wasim ?
— Malik Hammad (@Hammad_Iqbal786) May 6, 2024
pic.twitter.com/JVjn5EwPFs
इमाद वासिम तब्बल 1 वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतोय. तो सध्या 35 वर्षांचा आहे. पाकिस्तान टीमची मला सेवा करायची आहे, अशी इच्छा इमादनं टीममध्ये पुनरागमन केल्यानंतर जाहीर केलं होतं. आता तो कॅप्टन बाबर आझमशी नेमकं काय बोलत होता हे समजलेलं नाही. पण, दोघांमधील चर्चा सामान्य नव्हती, असा अंदाज क्रिकेट फॅन्स व्यक्त करतायत.
( नक्की वाचा : शाकिब कधी सुधारणार नाही! सेल्फी घेण्यासाठी आलेल्या फॅन्सचा पकडला गळा, Video )
आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा एकाच ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलाय. वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये जून महिन्यात हा वर्ल्ड कप होणार आहे. गेल्या वर्षी भारतामध्ये झालेल्या वन-डे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली होती. पाकिस्तानला सेमी फायनल गाठण्यातही अपयश आले होते. वन-डे वर्ल्ड कपनंतर बाबर आझमची कॅप्टन पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. पण काही महिन्यांमध्ये तो पुन्हा कॅप्टन बनलाय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world