जाहिरात
Story ProgressBack

अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार

Car Accident: अमेरिकेमध्ये भीषण दुर्घटनेत गुजरातमधील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Read Time: 2 min
अति घाई संकटात नेई! अमेरिकेत गुजरातच्या 3 महिलांचा मृत्यू, हवेत 20 फुट उंच उडाली कार
अमेरिकेमध्ये भीषण दुर्घटना, तीन भारतीय महिलांचा मृत्यू

Car Accident: अमेरिकेमध्ये भीषण कार अपघातात गुजरातमधील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. रेखा पटेल, संगीता पटेल आणि मनीषा पटेल अशी मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत. या महिला गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील रहिवासी होत्या. दक्षिण कॅरोलिना परिसरातील ग्रीनविले काउंटी येथे महिलांची कार पुलावरून खाली कोसळल्याने ही भीषण दुर्घटना घडली. रिपोर्ट्सनुसार, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महिलांची कार उलटली आणि रेलिंगवरून पुलाच्या उलट दिशेला असलेल्या झाडांवर जाऊन आदळली. झाडांवर आदळण्यापूर्वी अपघातग्रस्त कार तब्बल 20 फुट उंच हवेत उडाली.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा)

स्थानिक अधिकाऱ्याने डब्ल्यूएसपीए या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार,"महिला मर्यादित वेगापेक्षा अधिक वेगाने कार चालवत होत्या, हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. या दुर्घटनेत अन्य कोणत्याही वाहनाचा समावेश नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान अपघातग्रस्त कार एका झाडावर अडकलेल्या अवस्थेत आढळली. भरधाव कार झाडावर आदळल्याने गाडीचा अक्षरशः चुराडा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.  

(नक्की वाचा: दहशतवाद्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, मुलं जन्माला घालायची होती! इस्रायली तरुणीने सांगितली थरकाप उडवणारी कहाणी)

रस्ते अपघाताचा संदर्भ देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, "ही अतिशय धक्कादायक घटना आहे. एखादी भरधाव कार 4-6 लेन पार करून जवळपास 20 फुट उंच उडून रस्त्यालगतच्या झाडांवर आदळल्याची घटना फार क्वचितच पाहायला मिळाली आहे". 

(नक्की वाचा: अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या पाठिराख्यांचे आंदोलन, भारतीय वंशाच्या तरुणीला अटक)

या अपघातामध्ये कारमधील एक व्यक्ती बचावला आहे. गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तपास यंत्रणांनी मृतांच्या कुटुंबीयांना दुर्घटनेबाबतची माहिती कळवली आहे.  

VIDEO: मतदाराने कुऱ्हाडीने फोडलं EVM, नांदेडमधील मतदान केंद्रात प्रचंड गोंधळ

(Except for the headline, this story has not been edited by NDTV staff and is published from a press release)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination