जाहिरात
This Article is From Apr 26, 2024

अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या पाठिराख्यांचे आंदोलन, भारतीय वंशाच्या तरुणीला अटक

अमेरिकेतील विद्यापीठांमधील काही विद्यार्थी पॅलेस्टाईनविरोधात इस्रायलच्या सैनिकी कारवाईचा विरोध करत आहेत. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठापासून या आंदोलनांना सुरुवात झाली होती.

अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या पाठिराख्यांचे आंदोलन, भारतीय वंशाच्या तरुणीला अटक

अमेरिकेतील प्रिंस्टन विद्यापीठ हे जगातील प्रतिष्ठीत विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठामध्ये पॅलेस्टाईन समर्थकांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी भारतीय वंशाच्या तरुणीला अटक केली आहे. अचिंत्य शिवलिंगन असं या तरुणीचे नाव आहे. प्रिंस्टन अॅलुमनी विकली अर्थात पीएडब्लूने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, मूळच्या तमिळनाडूच्या असलेल्या अचिंत्यला विद्यापीठ परिसरात आंदोलन करणे आणि तंबू उभारणे या आरोपांखाली अटक करण्यात  आली आहे. गुरुवारी सकाळी विद्यापीठात पॅलेस्टाईन समर्थकांनी आंदोलन केले होते. अचिंत्यसोबतच हसन सईद नावाच्या विद्यार्थ्यालाही अटक करण्यात आली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

विद्यापीठाच्या प्रवक्त्या जेनिफर मॉरील यांनी या अटकेबद्दल बोलताना म्हटले आहे की, दोन विद्यार्थ्यांना घुसखोरी केल्याप्रकरणी अटक केली असून त्यांना तत्काळ विद्यापीठ परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. विद्यापीठ परिसरात तंबू लावणे हे विद्यापीठ नियमांच्या विरोधात आहे. अमेरिकेच्या विविध विद्यापीठांच्या परिसरात पॅलेस्टाईनच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. कारवाई करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढण्यात आलेले नाही आणि ते हॉस्टेलमध्ये राहू शकतात असे सांगण्यात आले आहे. विद्यापीठाचे अन्य प्रवक्ता मायकल हॉचकिस यांनीही सदर घटनेला दुजोरा दिला आहे. अचिंत्य ही इंटरनॅशनल डेव्हलपमेंटमध्ये मास्टर ऑफ पब्लिक अफेअर्सची पदवी मिळवण्यासाठी शिकत असून सैय्यद हा पीएचडी करत आहे. 

(दहशतवाद्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, मुलं जन्माला घालायची होती! इस्रायली तरुणीने सांगितली थरकाप उडवणारी कहाणी)

विद्यापीठाचे प्रवक्त्या जेनिफर मॉरेल यांनी म्हटले की, सदर विद्यार्थ्यांना सुरक्षा विभागातर्फे ते करत असलेली कृत्ये थांबवण्यास सांगण्यात आले होते. त्यांना विद्यापीठाचा परिसर सोडा असेही सांगण्यात आले होते. जर त्यांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. प्रवक्त्यांनी सांगितले की अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर इतर आंदोलकांना तिथून हटविण्यात आले. 

(नक्की वाचा - देवाला नमस्कार, बाईकवर स्टंट; 'स्पायडरमॅन' आणि 'स्पायडर वुमन' पोलिसांच्या ताब्यात)

अमेरिकेतील विद्यापीठांमधील काही विद्यार्थी पॅलेस्टाईनविरोधात इस्रायलच्या सैनिकी कारवाईचा विरोध करत आहेत. न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठापासून या आंदोलनांना सुरुवात झाली होती. हे लोण आता अमेरिकेच्या इतर भागांतही पसरण्यास सुरुवात झाली आहे. विद्यापीठांनी युद्धातून लाभ मिळवणाऱ्या कंपन्यांशी नाते तोडावे आणि इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात तत्काळ युद्धविराम  घोषित केला जावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com