18 hours ago
मुंबई:

Maharashtra assembly elections Exit Polls : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 विधानसभा मतदारसंघातील मतदान पूर्ण झालंय. यंदा राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत आहे. पण, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह बंडखोर आणि अपक्षही काही मतदारसंघात निर्णायक ठरु शकतात. 

लोकसभा निवडणुकांनंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकांकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सर्व एक्झिट पोलचे अपडेट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Nov 20, 2024 19:56 (IST)

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष

दैनिक भास्करच्या एग्झिट पोलमधील पक्षनिहाय अंदाज

भाजपा : 80-90

शिवसेना (शिंदे) : 30-35

राष्ट्रवादी (अजित पवार) : 15-20

काँग्रेस : 58-60

राष्ट्रवादी (शरद पवार) : 50-55

शिवसेना (ठाकरे) : 30-35

मनसे : 2-3

वंचित बहुजन आघाडी : 2-3

अपक्ष : 0-25

Nov 20, 2024 19:49 (IST)

'दैनिक भास्कर' च्या पोलनुसार महाविकास आघाडीला बहुमत

'दैनिक भास्कर' च्या एग्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. या पोलनुसार महाविकास आघाडीला 135-150, तर महायुतीला 125-140 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Nov 20, 2024 19:46 (IST)

मॅट्रीझ Exit Poll च्या पोलचे विभागनिहाय विश्लेषण

मॅट्रीझ Exit Poll - पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाला 7-10 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - विदर्भात राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाला 1-4 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मराठवाड्यात राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाला 1-4 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - ठाणे-कोकण राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाला 0-3 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मुंबईत राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाला 0-2 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी (अजित पवार)पक्षाला 0-3 जागा मिळण्याचा अंदाज

Nov 20, 2024 19:31 (IST)

मॅट्रीझ Exit Poll च्या पोलचे विभागनिहाय विश्लेषण

मॅट्रीझ Exit Poll - पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना(उबाठा)ला 2-3 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - विदर्भात शिवसेना(उबाठा)ला 2-3 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मराठवाड्यात शिवसेना(उबाठा)ला 6-8 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - ठाणे-कोकण शिवसेना(उबाठा)ला 3-5 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मुंबईत शिवसेना(उबाठा)ला 5-7 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - उत्तर महाराष्ट्रात शिवसेना(उबाठा)ला 4-6 जागा मिळण्याचा अंदाज

Advertisement
Nov 20, 2024 19:20 (IST)

महाराष्ट्राची गॅरंटी कुणाला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकात कुणाला किती जागा मिळणार याबाबतचा एक्झिट पोलचा अंदाज स्पष्ट झाला आहे.

Nov 20, 2024 19:13 (IST)

मॅट्रीझ Exit Poll चा अंदाज काय?

मॅट्रीझ Exit Poll - पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 20-22 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - विदर्भात भाजपला 24-27 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मराठवाड्यात भाजपला 11-13 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - ठाणे-कोकण भाजपला 10-12 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मुंबईत भाजपला 13-15 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - उत्तर महाराष्ट्रात भाजपला 10-12 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मुंबईत काँग्रेसला 4-6 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला 6-8 जागा मिळण्याचा अंदाज

Advertisement
Nov 20, 2024 19:11 (IST)

मॅट्रीझ Exit Poll चा अंदाज काय?

मॅट्रीझ Exit Poll - पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला 10-12 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - विदर्भात काँग्रेसला 12-14 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - मराठवाड्यात काँग्रेसला 7-9 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - ठाणे-कोकण काँग्रेसला 0-1 जागा मिळण्याचा अंदाज

Nov 20, 2024 19:07 (IST)

'NDTV मराठी' वरील राजकीय विश्लेषकांचा अंदाज

ज्येष्ठ विश्लेषक प्रकाश पवार:

भाजप: 75

शिवसेना शिंदे गट: 30

अजित पवार: 20

मनसे: 1-2

काँग्रेस: 50

उद्धव ठाकरे गट: 45

शरद पवार गट: 45

इतर: 20 - 22

महायुती: 125

महाविकास आघाडी: 140

Advertisement
Nov 20, 2024 19:06 (IST)

'NDTV मराठी' वरील राजकीय विश्लेषकांचा अंदाज

ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांचा अंदाज

भाजप: 75 -82

शिवसेना शिंदे गट: 35-40

अजित पवार गट: 15-18

मनसे: 5- 8 

काँग्रेस 60, 70

उद्धव ठाकरे गट: 35, 40

शरद पवार  गट: 30- 35

इतर: 12-15

महायुती: 125- 135

महाविकास आघाडी: 130 t0 135

Nov 20, 2024 19:04 (IST)

'NDTV मराठी' वरील राजकीय विश्लेषकांचा अंदाज

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचा अंदाज काय?

भाजप: 76- 82

शिवसेना शिंदे गट: 38-42

अजित पवार: 22-25

मनसे: 2

काँग्रेस: 55-61

उद्धव ठाकरे गट: 29-32

शरद पवार गट: 36-40

इतर: 16-18

महायुती: 139-128

महाविकास आघाडी: 128- 136

Nov 20, 2024 19:02 (IST)

मॅट्रीझ Exit Poll चा अंदाज काय?

मॅट्रीझ Exit Poll - विदर्भात भाजपला 24-27 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll - ठाणे, कोकण पट्ट्यात शिंदेंच्या शिवसेनेला 11-13 जागा मिळण्याचा अंदाज

मॅट्रीझ Exit Poll -  पश्चिम महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7-10 जागा

Nov 20, 2024 19:00 (IST)

P-मार्क नुसार महायुतीला बहुमत

P-मार्कनं महाराष्ट्र विधानसभेच्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 137-157 जागा दिल्या आहेत. तर, महाविकास आघाडीला 126-146 जागा देण्यात आल्या आहेत. 

Nov 20, 2024 18:56 (IST)

'पोल डायरी' नुसार महायुती सुसाट

'पोल डायरी' नं त्यांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 122-186 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर महाविकास आघाडीला 69-89 जागांचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. 

Nov 20, 2024 18:53 (IST)

'इलेक्टोरल एज' नुसार मविआला बहुमत

'इलेक्टोरल एज' च्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. या पोलमध्ये मविआला 150 जागा देण्यात आल्या आहेत. तर महायुतीची वाटचाल 118 पर्यंत मर्यादीत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

Nov 20, 2024 18:51 (IST)

'चाणक्य' चा एक्झिट पोलनुसार कुणाला किती जागा?

'चाणक्य स्ट्रॅटेजीस'च्या एक्झिट पोलनुसार महायुतीमधील भाजपाला 90+, शिवसेना (शिंदे) 48+, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला 22 + जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला 63+, शिवसेना (ठाकरे) - 35+, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला 40+ जागा मिळतील, असा अंदाज आहे.

Nov 20, 2024 18:47 (IST)

'चाणक्य' चा एक्झिट पोल काय सांगतो?

'चाणक्य स्ट्रॅटेजीस'च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 152-160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महाविकास आघाडीला 130-138 जागा मिळतील असं या पोलमध्ये स्पष्ट करण्यात आलंय.

Nov 20, 2024 18:43 (IST)

मॅट्रिज पोलनुसार महायुतीला बहुमत

मॅट्रिजच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. राज्यात 288 विधानसभेच्या जागा आहेत. बहुमत मिळवण्यासाठी 145 जागा मिळणे आवश्यक आहे. 

Nov 20, 2024 18:38 (IST)

लोक पोल सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला किती जागा?

लोक पोल सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडी (MVA) म्हणजेच काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षांना 151-162 जागा मिळण्याची शक्यता आहे.  

Nov 20, 2024 18:36 (IST)

IANS-मॅट्रिज ओपनियन पोलमध्ये महायुतीला 145-165 जागा मिळण्याचा अंदाज

IANS-मॅट्रिज ओपनियन पोलनुसार राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला 145-165 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

Nov 20, 2024 18:07 (IST)

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती झालं मतदान?

पाच वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झाले आहे. राज्यात आत्तापर्य्ंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात झाले आहे. गडचिरोलीत 69.63% मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाली असून त्याची नोंद 49.07% झाली आहे. 

Nov 20, 2024 17:52 (IST)

Maharashtra Exit Poll 2024 । कोणाचे सरकार येणार? अचूक विश्लेषण, परफेक्ट अंदाज

महाराष्ट्रामध्ये नवे सरकार कोणाचे येणार महायुती सत्ता राखणार का महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत विराजमान होणार? या प्रश्नांची उत्तरे मतदारांनी ईव्हीएममध्ये बंद केली आहे. 23 तारखेला या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मात्र या निवडणुकीचे आम्ही आकलन करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फिरून वार्तांकन केलेल्या राहुल कुलकर्णी, विनोद तळेकर आणि रौकन कुकडे यांनी मतदारांचा कानोसाही घेतला. हे तिघेही नेमकं आणि परफेक्ट विश्लेषण सादर करत आहेत.

Nov 20, 2024 17:33 (IST)

Maharashtra Exit Polls 2024 : मतदान अंतिम टप्प्यात, एक्झिट पोलची प्रतीक्षा

अत्यंत चुरशीनं लढल्या गेलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान आता अंतिम टप्प्यात आलं आहे. मतदान संपण्यास अगदी थोडा अवधी शिल्लक असून आता सर्वांना एक्झिट पोलची प्रतीक्षा आहे.