8 minutes ago

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकासाठीचा सामना अगदी एकतर्फी राहीला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला अगदी सहज नमवलं.  या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे.  

Sep 14, 2025 23:21 (IST)

IND Vs PAK Match: टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सुपर 4 मध्ये प्रवेश

टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. भारताने सात विकेटने हा सामना जिंकला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 127 धावांचे आव्हान भारताने सोळाव्या ओव्हरमध्ये गाठले. कर्णधार सुर्यकुमार यादवने सिक्स मारत विजय साजरा केला. सुर्यकुमार यादवने  47 धावा केल्या. अभिषेक शर्माने 31  धावा केल्या. तर तिलक वर्मानेही 31 धावा केल्या. शुभमन गिल आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दहा धावा केल्या. शिवम दुबे नाबाद राहीला. पाकिस्तानच्या बॉलर्सना जास्त काही करता आले नाही. सैम अयुबने तीन विकेट घेतल्या. अन्य बॉलर्सला सफलता मिळाली नाही. या विजयासह भारत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे.  

Sep 14, 2025 23:05 (IST)

ind vs Pak Live: टीम इंडियाच्या 100 रन्स पुर्ण

टीम इंडियाने तेराव्या ओव्हर्समध्ये १०० धावा पूर्ण केल्या आहेत. आता विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 

Sep 14, 2025 23:03 (IST)

IND Vs PAK Match Live Update: तिलक वर्मा 31 धावांवर बाद, सैम अयुबची तिसरी विकेट

IND Vs PAK Match Live Update: तिलक वर्मा 31 धावांवर बाद झाला. त्याला सैम अयुबने क्लिन बोल्ड केले.  त्याला ही तिसरी विकेट मिळाली आहे. त्यानंतर शिवम दुबे मैदानात फलंदाजीसाठी आला आहे. 

Sep 14, 2025 22:58 (IST)

Ind vs Pak Live: तिलक वर्माच्या कॅच सोडला

नवाज याने स्वताच्या बॉलिंगवर  तिलक वर्माचा कॅच सोडला.  तिलक वर्मा ३० धावांवर खेळत होता. 

Advertisement
Sep 14, 2025 22:54 (IST)

ind vs Pak Live: सुर्या आणि तिलक वर्माची 50 रन्सची पार्टनरशीप

कॅप्टन सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची भागिदारी केली आहे. विजयाच्या दिशेने भारताने पाऊल टाकले आहे. 

Sep 14, 2025 22:48 (IST)

IND Vs PAK Match Live Update: टीम इंडियाने 10 ओव्हर्समध्ये ठोकल्या 88 धावा

IND Vs PAK Match Live Update: टीम इंडियाने 10 ओव्हर्समध्ये 88 धावा ठोकल्या आहेत. आता 10 ओव्हर्समध्ये भारताला 40 धावांची गरज आहे. सुर्यकुमार यादव 17 धावांवर तर तिलक वर्मा 28 धावांवर खेळत आहे. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल ही सलामीची जोडी तंबूत परतली आहे. 

Advertisement
Sep 14, 2025 22:33 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाने चोपल्या 61 धावा

IND Vs PAK Match Live Update:  पॉवर प्लेमध्ये टीम इंडियाने 61 धावा चोपल्या आहेत. भारताच्या दोन विकेट गेल्या आहेत. सहा ओव्हर्सनंतर सुर्यकुमार यादव तीन तर तिलक वर्मा १५ धावांवर खेळत आहे.  

Sep 14, 2025 22:28 (IST)

IND Vs PAK Match Live Update: 5 ओव्हर्सनंतर भारताची धावसंख्या 2 बाद 48

IND Vs PAK Match Live Update:  5 ओव्हर्सनंतर भारताची धावसंख्या 2 बाद 48 झाली आहे. सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे सध्या मैदानावर आहेत. 

Advertisement
Sep 14, 2025 22:22 (IST)

IND Vs PAK Match Live Update: भारताला दुसरा झटका, अभिषेक शर्मा 31 धावांवर आऊट

IND Vs PAK Match Live Update:  भारताला दुसरा झटका बसला आहे.  अभिषेक शर्मा 31 धावांवर आऊट झाला आहे. त्याने 13 चेंडूत 31 धावांची जबरदस्त खेळी केली. पण त्याला मोठी खेळी उभारण्यात यश आलं नाही. त्याला सैम अयुबने आऊट केले. अभिषेकने दोन सिक्स आणि चार चौकार लगावले. 

Sep 14, 2025 22:14 (IST)

IND Vs PAK Match Live Update: भारताला पहिला झटका, शुभमन गील 10 धावांवर आऊट

IND Vs PAK Match Live Update:  भारताला पहिला झटका, शुभमन गील 10 धावांवर आऊट 

सैम अयुबने शुभमन गिलला स्टम्प आऊट केलं आहे. शुभमनने सात चेंडूत दहा धावा केल्या. भारताची धावसंख्या दोन ओव्हर्समध्ये 22 झाली आहे. 

Sep 14, 2025 22:08 (IST)

IND Vs PAK Match Live Update: भारताच्या डावाला सुरूवात, आफ्रीदीच्या पहिल्याच बॉलवर चौकार

IND Vs PAK Match Live Update:  भारताच्या डावाला सुरूवात, आफ्रीदीच्या पहिल्याच बॉलवर चौकार

अभिषेक शर्माने भारताच्या डावाची जोरदार सुरूवात केली. शाहीनशहा आफ्रीदीच्या पहिल्या चेंडूवर चौकार तर दुसऱ्या बॉलवर षटकार ठोकला. पहिल्या ओव्हरमध्ये १२ धावा झाल्या.  

Sep 14, 2025 21:48 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानच्या 20 ओव्हर्समध्ये 127 धावा, भारताला 128 धावांचे लक्ष्य

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानच्या 20 ओव्हर्समध्ये 127 धावा, भारताला 128 धावांचे लक्ष्य 

शाहीनशहा आफ्रीदीने शेवटच्या षटकात केलेल्या धावांमुळे पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 127 धावा करता आल्या. पाकिस्तानचे नऊ फलंदाज आऊट झाले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरान याने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर शाहीनशहा आफ्रीदीने 16 चेंडूत 33 धावा काढल्या. पाकिस्तानच्या अन्य एकाही बॅट्समनला चांगल्या धावा करता आल्या नाहीत. पाकिस्तानी फलंदाजांना भारतीय फिरकी समोर नांगी टाकली. कुलदीप यादवने तीन तर अक्षर पटेलने दोन जणांना बाद केले. तर बुमराने ही दोन फलंदाजांना बाद केले. हार्दीक पंड्या आणि वरुण चक्रवतीने प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताला विजयासाठी 128 धावांची गरज आहे. 

Sep 14, 2025 21:40 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानला 9 वा धक्का, सपशेल शरणागती

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानला 9 वा धक्का, सपशेल शरणागती , मुकीमला बुमराने क्लिन बोल्ड करत पाकिस्तानला नववा धक्का दिला. पाकिस्तानच्या १९ ओव्हरमध्ये १११ धावा झाल्या आहेत. 

Sep 14, 2025 21:33 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानचा खेळ खल्लास, 97 धावात 8 जण तंबूत

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानचा खेळ खल्लास झाल्यात जमा आहे.  97 धावात पाकिस्तानते 8 जण बाद झाले आहेत. फईम अशरफ याला वरूण चक्रवर्तीने एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने अकरा धावा केल्या. तो बाद होणारा आठवा फलंदाज होता.  

Sep 14, 2025 21:27 (IST)

IND Vs PAK Match Live Update: शाहीन आफ्रीदाचा पहिल्याच चेंडूवर सिक्स, पाक 7 बाद 90

IND Vs PAK Match Live Update:  शाहीन आफ्रीदीने  पहिल्याच चेंडूवर सिक्स मारत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. त्याने कुलदीप यादवच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स मारला.  पाकिस्तानची धावसंध्या 7 बाद 90 झाली आहे. 

Sep 14, 2025 21:24 (IST)

ind vs Pak Live: पाकिस्तानला 7 वा झटका, फरहान आऊट

पाकिस्तानला सातवा झटका बसला आहे. साहिबजादा फरहान हा बाद झाला आहे. त्याने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याला कुलदीप यादव याने आऊट केले. त्याच कॅच हार्दीक पंड्याने घेतला. पाकिस्तानची अवस्था सात बाद 83 झाली आहे. सतरावी ओव्हर सुरू आहे. फिरकीच्या जाळ्यात पाकिस्तानचा संघ अडकला आहे.  

Sep 14, 2025 21:17 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाक बॅट्समनला बॉलच समजेना, फिरकीच्या जाळ्यात अडकले

पाकिस्तानी फलंदाज भारताच्या फरकी जाळ्यात अडकले. त्यांना बॉलच समजत नव्हते. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी त्यांना जखडून ठेवले होते. दोघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  पंधरा ओव्हरमध्ये पाकिस्तानला ७८ धावा करता आल्या. त्यांचे सहा बॅट्समन आऊट झाले आहेत. 

Sep 14, 2025 21:08 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानचा 6 वा फलंदाज बाद, मोहम्मद नवाज शुन्यावर आऊट

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानचा 6 वा फलंदाज बाद, मोहम्मद नवाज शुन्यावर आऊट. कुलदीप यादवने केले बाद.  कुलदीपने आतापर्यंत दोन विकेट घेतल्या आहेत. 

Sep 14, 2025 21:05 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानची निम्मी टीम तंबूत, टीम इंडियाच्या बॉलर पुढे नांगी

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानची निम्मी टीम तंबूत परतली आहे.  टीम इंडियाच्या बॉलर पुढे पाक फलंदाजांनी नांगी टाकली आहे. पाकिस्तानची अवस्था तेराव्या ओव्हरला 64 धावांवर 5 बाद अशी झाली आहे. 

Sep 14, 2025 20:54 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानचा डाव कोसळला, 4 बाद 49 अशी अवस्था

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानचा डाव कोसळला, 4 बाद 49 अशी अवस्था झाली आहे. सलमान आगा याला अक्षर पटेल यांना बाद केले. त्याने फक्त तीन धावा केल्या.  

Sep 14, 2025 20:45 (IST)

ind vs Pak live: पाकिस्तानला 3 झटका, फकर जमान आऊट

पाकिस्तानला तिसरा झटका बसला आहे. मैदानावर जम बसलेला फकर जमान आऊट झाला आहे. त्याला अक्षर पटेलने आउट केले. फकर ने सतरा धावा केल्या. तो झेल बाद झाला. पाकिस्तानचा स्कोर आता 45 वर 3 बाद असा झाला आहे. नववी ओव्हर सुरू आहे. 

Sep 14, 2025 20:36 (IST)

Ind vs Pak Live: 6 ओव्हरनंतर पाकिस्तान 42 धावांत 2 बाद

पहिला पॉवर प्ले संपला आहे. पॉवर प्लेच्या  6 ओव्हरनंतर पाकिस्तान 42 धावांत 2 बाद अशा स्थितीत आहे.  सातच्या सरासरीने पाकिस्तानने धावा केल्या आहेत.  

Sep 14, 2025 20:30 (IST)

ind vs Pak Live : 5 ओव्हरनंतर पाकिस्तान 34 धावांवर 2 आऊट

सुरुवातीच्या पडझडीनंतर पाकिस्तानचा डाव थोडा सावरला आहे. पाच ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या 34 धावा झाल्या आहेत. त्यांचे दोन गडी बाद झाले आहेत. मैदानावर फरहान 11 आणि झमान 16 धावांवर खेळत आहेत.  

Sep 14, 2025 20:22 (IST)

Ind vs Pak Live: 3 ओव्हर नंतर पाकिस्तानची स्थिती 20 धावांवर 2 बाद

Ind vs Pak Live: 3 ओव्हर नंतर पाकिस्तानची स्थिती 20 धावांवर 2 बाद फकर दहा धावांवर तर फरहान तीन धावांवर खेळत आहेत. पंड्या आणि बुमरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे. 

Sep 14, 2025 20:11 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानला दुसरा झटका, पंड्या पाठोपाठ बुमराने घेतली विकेट

IND Vs PAK Match Live Update:  पाकिस्तानला दुसरा झटका,  पंड्या पाठोपाठ बुमराने घेतली विकेट मोम्मद हॅरीस अवघ्या तीन धावा करून बाद झाला आहे. त्याचा कॅच हार्दीक पंड्याने पकडला. त्याला बुमराने आऊट केले. पहिल्या ओव्हरमध्ये पंड्यानेही एक विकेट घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानला लागोपाठ दोन झटके बसले आहेत. 6 धावांवर 2 बाद अशी स्थिती झाली आहे.  

Sep 14, 2025 20:03 (IST)

IND Vs PAK Match Live Update: भारत पाकिस्तान मॅचचा थरार सुरू

IND Vs PAK Match Live Update: भारत पाकिस्तान मॅचचा थरार सुरू झाला आहे. पहिली ओव्हर हार्दीक पंड्याने टाकली. शिवाय दुसऱ्याच चेंडूवर सॅमीला कॅच आऊट केले. 

Sep 14, 2025 19:34 (IST)

ind vs pak : टीम इंडिया पहिले बॉलिंग करणार

पाकिस्तानचा कॅप्टनने टॉस जिंकला अजून त्याने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आम्हाला पहिले बॉलींगच करायची होती असं टॉस हरल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सुर्यकुमार यादव याने सांगितले.

Sep 14, 2025 19:32 (IST)

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानने टॉस जिंकला, बॅटींग करण्याचा निर्णय

IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानने टॉस जिंकला,  बॅटींग करण्याचा निर्णय 

Sep 14, 2025 19:20 (IST)

भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: भारतीय खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले

भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह: खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले

दोन्ही संघांचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. थोड्याच वेळात टॉस होईल. ताज्या छायाचित्रांमध्ये भारतीय खेळाडू सराव (ड्रिल) करताना दिसत आहेत

Sep 14, 2025 19:19 (IST)

भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: नव्या खेळपट्टीवर होणार सामना

भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: नव्या खेळपट्टीवर सामना

हा सामना नव्या खेळपट्टीवर होईल. गौतम गंभीरला खेळपट्टीचा अभ्यास करताना पाहिले आहे.

या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांना यश मिळाले आहे. याव्यतिरिक्त, भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धेत मागील 8 पैकी 7 सामने लक्ष्य पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.

Sep 14, 2025 18:39 (IST)

भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: हाय-व्होल्टेज सामन्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था

दुबई पोलिसांमधील ऑपरेशन्सचे असिस्टंट कमांडर-इन-चीफ मेजर जनरल सैफ मुहैर अल मजरूई यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, हिंसाचार, वस्तू फेकणे किंवा वर्णद्वेषी व अपमानास्पद भाषेचा वापर केल्यास 30,000 दिरहम (7 लाख रुपयांपेक्षा जास्त) दंड आणि कारावास किंवा हद्दपारी होऊ शकते.

Sep 14, 2025 17:54 (IST)

Ind vs Pak Live: मॅच आधी बीसीसीआयने केले ट्वीट

Sep 14, 2025 17:50 (IST)

ind vs pak Live: गुणतालीकेत भारत पहिल्या स्थानावर

भारताने आपला पहिला सामना यूएई विरुद्ध 9 विकेट्सने जिंकून ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

पाकिस्तानने ओमान विरुद्ध 93 धावांनी विजय मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे.

Sep 14, 2025 17:50 (IST)

ind vs Pak Live: भारत आणि पाकिस्तान येणार आमने सामने

एशिया कप 2025 च्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत.

Sep 14, 2025 17:40 (IST)

ind vs Pak Live : थोड्याच वेळात सुरू होणार भारत पाक सामन्याचा थरार

थोड्याच वेळात सुरू होणार भारत पाक सामन्याचा थरार सुरू होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.