भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिय चषकासाठीचा सामना होत आहे. या सामन्याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली आहे. या सामन्यात कोण कोणाला मात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर हा सामना होवू नये साठी भारतातून विरोध होतानाही दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा सामना होत आहे.
Ind vs Pak Live: 6 ओव्हरनंतर पाकिस्तान 42 धावांत 2 बाद
पहिला पॉवर प्ले संपला आहे. पॉवर प्लेच्या 6 ओव्हरनंतर पाकिस्तान 42 धावांत 2 बाद अशा स्थितीत आहे. सातच्या सरासरीने पाकिस्तानने धावा केल्या आहेत.
ind vs Pak Live : 5 ओव्हरनंतर पाकिस्तान 34 धावांवर 2 आऊट
सुरुवातीच्या पडझडीनंतर पाकिस्तानचा डाव थोडा सावरला आहे. पाच ओव्हर्समध्ये पाकिस्तानच्या 34 धावा झाल्या आहेत. त्यांचे दोन गडी बाद झाले आहेत. मैदानावर फरहान 11 आणि झमान 16 धावांवर खेळत आहेत.
Ind vs Pak Live: 3 ओव्हर नंतर पाकिस्तानची स्थिती 20 धावांवर 2 बाद
Ind vs Pak Live: 3 ओव्हर नंतर पाकिस्तानची स्थिती 20 धावांवर 2 बाद फकर दहा धावांवर तर फरहान तीन धावांवर खेळत आहेत. पंड्या आणि बुमरा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.
IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानला दुसरा झटका, पंड्या पाठोपाठ बुमराने घेतली विकेट
IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानला दुसरा झटका, पंड्या पाठोपाठ बुमराने घेतली विकेट मोम्मद हॅरीस अवघ्या तीन धावा करून बाद झाला आहे. त्याचा कॅच हार्दीक पंड्याने पकडला. त्याला बुमराने आऊट केले. पहिल्या ओव्हरमध्ये पंड्यानेही एक विकेट घेतली होती. त्यामुळे पाकिस्तानला लागोपाठ दोन झटके बसले आहेत. 6 धावांवर 2 बाद अशी स्थिती झाली आहे.
IND Vs PAK Match Live Update: भारत पाकिस्तान मॅचचा थरार सुरू
IND Vs PAK Match Live Update: भारत पाकिस्तान मॅचचा थरार सुरू झाला आहे. पहिली ओव्हर हार्दीक पंड्याने टाकली. शिवाय दुसऱ्याच चेंडूवर सॅमीला कॅच आऊट केले.
ind vs pak : टीम इंडिया पहिले बॉलिंग करणार
पाकिस्तानचा कॅप्टनने टॉस जिंकला अजून त्याने बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आम्हाला पहिले बॉलींगच करायची होती असं टॉस हरल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन सुर्यकुमार यादव याने सांगितले.
IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानने टॉस जिंकला, बॅटींग करण्याचा निर्णय
IND Vs PAK Match Live Update: पाकिस्तानने टॉस जिंकला, बॅटींग करण्याचा निर्णय
भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: भारतीय खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले
भारत विरुद्ध पाकिस्तान लाईव्ह: खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले
दोन्ही संघांचे खेळाडू स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. थोड्याच वेळात टॉस होईल. ताज्या छायाचित्रांमध्ये भारतीय खेळाडू सराव (ड्रिल) करताना दिसत आहेत
भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: नव्या खेळपट्टीवर होणार सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: नव्या खेळपट्टीवर सामना
हा सामना नव्या खेळपट्टीवर होईल. गौतम गंभीरला खेळपट्टीचा अभ्यास करताना पाहिले आहे.
या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघांना यश मिळाले आहे. याव्यतिरिक्त, भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धेत मागील 8 पैकी 7 सामने लक्ष्य पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान LIVE: हाय-व्होल्टेज सामन्यासाठी मोठी सुरक्षा व्यवस्था
दुबई पोलिसांमधील ऑपरेशन्सचे असिस्टंट कमांडर-इन-चीफ मेजर जनरल सैफ मुहैर अल मजरूई यांच्या मते, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मनीकंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार, हिंसाचार, वस्तू फेकणे किंवा वर्णद्वेषी व अपमानास्पद भाषेचा वापर केल्यास 30,000 दिरहम (7 लाख रुपयांपेक्षा जास्त) दंड आणि कारावास किंवा हद्दपारी होऊ शकते.
Ind vs Pak Live: मॅच आधी बीसीसीआयने केले ट्वीट
All Set & Raring To Go 👍 💪
— BCCI (@BCCI) September 14, 2025
It's Match No. 2️⃣ for #TeamIndia 🇮🇳 in #AsiaCup2025 pic.twitter.com/vKUgTJ1HAD
ind vs pak Live: गुणतालीकेत भारत पहिल्या स्थानावर
भारताने आपला पहिला सामना यूएई विरुद्ध 9 विकेट्सने जिंकून ग्रुप-ए मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
पाकिस्तानने ओमान विरुद्ध 93 धावांनी विजय मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे.
ind vs Pak Live: भारत आणि पाकिस्तान येणार आमने सामने
एशिया कप 2025 च्या सहाव्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत.
ind vs Pak Live : थोड्याच वेळात सुरू होणार भारत पाक सामन्याचा थरार
थोड्याच वेळात सुरू होणार भारत पाक सामन्याचा थरार सुरू होणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.