Maharashtra Municipal Corporation Elections : आगामी महानगरपालिका (BMC Election 2026) निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात एक मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा आज होणार आहे. आज २४ डिसेंबरला दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
आगामी महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याने ही युती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. यावेळी आगामी महानगरपालिकेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: चुकाल तर संपाल; तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हा संदेश मी देतो आहे- उद्धव ठाकरे
जे महाराष्ट्रप्रेमी आहेत, ते युतीमध्ये येऊ शकतात. ही महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे. - उद्धव ठाकरे
चुकाल तर संपाल; तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका हा संदेश मी देतो आहे.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: 'शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाली, हे जाहीर करतो' - राज ठाकरे
राज ठाकरे काय म्हणाले?
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्या वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली.
कोण किती जागा लढवणार, हे तुम्हाला सांगणार नाही.
महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याची टोळी फिरतेय, काही टोळ्या राजकीय उमेदवारांना पळवतायेत. त्यामुळे आज आम्ही कोणाला किती जागा हे जाहीर करीत नाहीये.
शिवसेना आणि मनसेची युती जाहीर झाली, हे जाहीर करतो.
मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: 'मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार' - राज ठाकरे
मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार - राज ठाकरे
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: 'एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी...' - उद्धव ठाकरे
आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबई अन् महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने पाहिलं त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही... - उद्धव ठाकरे
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates:उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात...
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये पोहोचले
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे वरळीतील हॉटेल ब्लू सीमध्ये पोहोचले आहेत. काही वेळात पत्रकार परिषदेला होईल सुरुवात...
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates:रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही एकत्रित घेतलं दर्शन
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या सह रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही पुष्प अर्पण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल...
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवतीर्थावरुन रवाना
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवतीर्थावरुन रवाना...बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या दिशेने रवाना
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, पाहा Live
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थान परिसरात दाखल
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थान परिसरात पोहोचले..., थोड्याच वेळात ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दाखल होतील.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: राज ठाकरे गाडीचं सारथ्य करणार...
राज ठाकरे गाडीचं सारथ्य करणार...
उद्धव ठाकरे शिवतीर्थावर येतील, यानंतर त्यांच्यात बातचीत होईल आणि त्यानंतर दोघे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दर्शनासाठी जातील. यावेळी राज ठाकरे स्वत: गाडी चालवित उद्धव ठाकरेंना सोबत घेत स्मृतीस्थळी पोहोचतील.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी गर्दी
शिवाजी पार्कातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक आणि मनसैनिकांची मोठी गर्दी.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या घरातून शिवाजी पार्कच्या दिशेने निघणार..
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्याकडे येतील. यानंतर एकत्रितपणे दोघेही दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेणार आहेत.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: पैसा पाणी संपून जाणार ठाकरे ब्रँड निवडून येणार'.. नाशिकमध्ये घोषणाबाजी
पैसा पाणी संपून जाणार ठाकरे ब्रँड निवडून येणार'.. नाशिकमध्ये घोषणाबाजी
ठाकरे ब्रँड आज एकत्र येणार असून त्याबाबत अधिकृत घोषणा थोड्याच वेळात केली जाणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर एकेकाळी मनसे आणि ठाकरेंचा देखील बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक मध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष साजरा केला जात असून 'पैसा पाणी संपून जाणार ठाकरे ब्रँड निवडून येणार' अशी घोषणाबाजी केली जाते आहे.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: ठाकरे बंधू एकत्र आल्याने दिल्लीकरांच्या पोटात गोळा - संजय राऊत
संजय राऊत ठाकरेंच्या युतीबाबत काय म्हणाले?
आजचा दिवस ऐतिहासिक पर्वाची सुरुवातमराठी माणसासाठी आज मंगलमय दिवस.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने दिल्लीकरांच्या पोटात गोळा -
मुंबईसह इतर पालिकांमध्ये जागावाटप पूर्ण.
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: ठाकरे बंधूंचे मामा युतीबाबत काय म्हणाले?
Shiv Sena UBT - MNS Alliance Live Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेणार आहे. दुपारी १२ वाजता वरळी येथी ही पत्रकार परिषद होणार आहे.