9 days ago

US Presidential Elections:  कोण होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष... डोनाल्डा ट्रम्प की कमला हॅरिस? या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळणार आहे. अमेरिकेतील निवडणुकीचे निकाल येऊ लागले आहेत. जगातील या शक्तिशाली खुर्चीवर कोण विराजमान होणार आहे? याचे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार होईल.

Nov 06, 2024 13:27 (IST)

महिला उमेदवाराला राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान करण्याची मानसिकता तयार झालेली नाही.   - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 13:27 (IST)

उच्चशिक्षित महिलांनी हॅरिस यांना पाठिंबा दर्शवला नाही. डेमोक्रेटमधील 4-5 टक्के उच्चशिक्षित महिला मतदारांनीही त्यांना मतदान केले नाही, त्यामुळे स्विंग स्टेट्समध्ये खूप मोठा फरक पडला. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 13:27 (IST)

सुरुवातीला बायडन अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, पण नंतर त्यांनी हॅरिस यांना संधी दिली आणि हा बदल लोकांना आवडला नाही  - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 13:26 (IST)

बायडन-हॅरिस यांनी खूप चांगलं काम केलंय. मागील 1 वर्षामध्ये 10 लाखाच्या वर रोजगार उपलब्ध करून दिला. पण मतदारांपर्यंत हा मुद्दा थेट पोहोचला नाही - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Advertisement
Nov 06, 2024 13:26 (IST)

बायडन यांनी सत्ता हाती घेतली, त्यानंतर 4 वर्षांत 10 लाख स्थलांतरित नागरिकांची नोंद करण्यात आली. तर तो पण एक राग होता. स्विंग स्टेट्समध्ये ओबामा, बायडन यांना खूप मतं मिळाली. पण हॅरिस यांना कमी मतं मिळाली. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 13:26 (IST)

बायडन-हॅरिस यांना प्रचारादरम्यान असा कोणताही मुद्दा मिळाला नाही की जे ट्रम्प यांना प्रत्युत्तर देऊ शकतात. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Advertisement
Nov 06, 2024 13:25 (IST)

सोशल मीडियापासून ते टीव्ही जाहिरातींपर्यंत ट्रम्प यांनी इमिग्रेशन, सीमासुरक्षाच्या मुद्यावर भर दिला. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतर थांबवलं पाहिजे, असे वातावरण निर्माण झाले. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 13:06 (IST)

पुढची 4 वर्ष अमेरिकेसाठी सुवर्णकाळ - डोनाल्ड ट्रम्प

Advertisement
Nov 06, 2024 13:06 (IST)

आपण इतिहास घडवला आहे. या प्रकारचा राजकीय विजय कधीही पाहिला नाही. तुमच्यासाठी लढत राहणार  - डोनाल्ड ट्रम्प

Nov 06, 2024 12:53 (IST)

ज्या राज्यांमध्ये 10-20 हजार मतांनी ट्रम्प यांना आघाडी मिळालीय तेथे भारतीय, मेक्सिकन आणि स्पॅनिश नागरिकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे असे वातावरण तयार झाले होते की कमला हॅरिस यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांपासून स्वतःला जाणूनबुजून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल होता, पण  ते थोडे त्यांच्या अंगलट आले.- दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:43 (IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे जे संबंध आहेत, त्याचा खूप मोठा फायदा स्विंग स्टेटमध्ये पाहायला मिळाला. येथे 4 लाख भारतीय वंशाचे मतदार आहेत आणि या सर्वांनी ट्रम्प यांना मत दिल्याचे दिसून येतेय. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:42 (IST)

कमला हॅरिस यांनी आपण मूळ भारतीय आहोत असे न सांगता आपण कृष्णवर्णीय आहोत, असा प्रचार केला. दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:41 (IST)

अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, फॉक्स न्यूजचे वृत्त

Nov 06, 2024 12:36 (IST)

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होते, त्यावेळेस त्यांनी टॅक्सेशन जे काही नियम होते, त्यामध्ये बदल करून बरीच सुधारणा केली. यामुळे उद्योजक, मध्यम वर्गीयांना खूप फायदा मिळाला होता आणि ज्यावेळेस बायडन यांनी टॅक्स रिफॉर्म करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मध्यम वर्गीयांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला होता. याचा फटका देखील कमला हॅरिस यांना बसला आहे - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:32 (IST)

कर आकारणी आणि अर्थव्यवस्था वाढ या विषयांवर सर्वाधिक मतदान झाले आहे, अर्थव्यवस्था स्थिर कशी करावी, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता.  - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:32 (IST)

हॉटेल-रेस्टॉरंट्समध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी कर माफ करण्याचा जास्त प्रचार ट्रम्प यांनी केला. यामुळे भारतीय वंशाचे नागरिक असतील त्यांना मोठा दिलासा मिळाला.  - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:24 (IST)

लोकापर्यंत पोहोचण्यासाठी ट्रम्प यांना यश मिळाले - दिलीप म्हस्के

कमला हॅरिस यांच्यासमोर सर्वात मोठी समस्या ही होती की त्यांच्याकडे प्रचारासाठी वेळ उरला नव्हता. 180 दिवसांचा कालावधी त्यांच्याकडे होता आणि हा फार कमी कालावधी होता. त्यामुळे त्यांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी यश मिळाले नाही, जे डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाले.  - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:23 (IST)

ट्रम्प हल्ल्यामुळे चित्र बदलले - दिलीप म्हस्के

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर सर्व चित्र बदलले होते. अमेरिकेतील दक्षिणेकडील जी राज्य आहेत तेथील 80-90 टक्के मतं ट्रम्प यांच्याकडे वळली आहेत. सर्वात महत्त्वाचे राज्य पेन्सिलवेनिया तेथेच हा हल्ला झाल्यामुळे जे रिपब्लिकन मतदार होते त्यांनी खूप मेहनत घेऊन पाच स्विंग स्टेट त्यांनी आपल्याकडे वळवली आहेत. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 12:10 (IST)

सातही स्विंग स्टेट्समध्ये ट्रम्प यांची आघाडी, कलमा हॅरिस पिछाडीवर

Nov 06, 2024 12:09 (IST)

डोनाल्ड ट्रम्प यांना मॅजिक फिगर गाठण्यासाठी 23 जागांची आवश्यकता

कमला हॅरिस काहीशा पिछाडीवर दिसत आहेत. कमला हॅरिस 210 जागांवर आहेत, तर ट्रम्प 247 जागांवर पोहोचले आहेत. मॅजिक फिगर गाठण्यासाठी 23 जागांची आवश्यकता आहे.

Nov 06, 2024 11:55 (IST)

आताचे जे पाच मिनिटांपूर्वीचे नवीन ट्रेंड आहेत, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय मानला जात आहे. कमीत कमी त्यांना 301 जागा मिळणार आहेत. त्यांना 270 पेक्षाही जास्त जागा मिळणार आहेत. पेन्सिलवेनिया येथे डेमेक्रॅटिक पक्षाला ज्या जागांवर विजयाची आशा होती त्या जागा  रिपब्लिकन पार्टीकडे गेल्या आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्र्म्प यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. - दिलीप म्हस्के, आयुक्त, न्यूजर्सी (इंडिया कमिशन)

Nov 06, 2024 11:40 (IST)

डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाकडे वाटचाल. ट्रम्प सध्या 246 जागांवर आघाडीवर आहेत. तर कमला हॅरिस 210 जागांवर आघाडीवर आहेत.

Nov 06, 2024 11:31 (IST)

प्राथमिक कलांमध्ये रिपब्लिकन पक्षाला बहुमत

असोसिएटेड प्रेसच्या मते, प्राथमिक कलांनुसार रिपब्लिकन पक्षाने ओहियो आणि वेस्ट व्हर्जिनियामध्ये जागा मिळवल्यानंतर तसेच टेक्सास आणि नेब्रास्कामध्ये त्यांच्या उमेदवारांच्या विजयानंतर संसदेत बहुमत मिळवले आहे.