TISS च्या 100 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड; तडकाफडकी नोकरीवरून काढलं 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटवण्यात आलं आहे. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून हटवण्यात आलं आहे. यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 29 जून रोजी टीसच्या 100 कर्मचाऱ्यांना नोकरीच्या कराराचे नुतनीकरण करण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं. टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून नियमित निधी मिळत नसल्याचं कारण सांगत या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. 

यातील अनेक कर्मचारी गेले 2008 पासून टीसमध्ये कार्यरत होते. त्यांनी वेगवेगळे अभ्यासक्रम आणि संशोधन प्रकल्प राबवले आहेत. त्यांने प्रकल्प अजूनही सुरू आहेत. त्यातच त्यांना कामावरून हटवण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये 60 शिक्षक तर उरलेले 40 उर्वरीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गेले काही महिने आम्ही टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी बोलत राहिलो, मात्र या कर्मचाऱ्यांच्य पगाराचे पैसे काही मिळाले नाही. गेल्या महिन्याचा पगारही 'टीस'च्या राखीव निधीतून करण्यात आला. शेवटी या कर्मचाऱ्यांची नोकरी थांबवावी लागली असे 'टीस'च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.