दारु सोडवण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू, दोघांची प्रकृती गंभीर; चंद्रपुरातील घटनेने खळबळ

सहयोग जीवतोडे, प्रतीक दडमल या दोघांचा मृत्यू झाला. तर सदाशिव जीवतोडे ( वय 45 वर्ष ), सोमेश्वर वाकडे ( वय 35 वर्ष ) यांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर उपचार सुरु आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

दारु सोडवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूरच्या भद्रावती तालुक्यात घडली आहे. दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी काही तरुणांनी औषध घेतले. यापैकी दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. सहयोग जीवतोडे (वय 19 वर्ष ), प्रतिक दडमल ( वय 26 वर्ष ) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भद्रावती तालुक्यात येणाऱ्या वडेगाव-गुडगाव येथील काही तरुणांना दारूचे व्यसन लागले होते. व्यसनातून सुटका मिळवण्यासाठी या तरुणांनी दारू सोडण्याची औषधे घेतली होती औषध घेतल्यानंतर चार तरुणांची प्रकृती अचानक बिघडली. 

तरुणांना त्यानंतर उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात सहयोग जीवतोडे, प्रतिक दडमल या दोघांचा मृत्यू झाला. तर सदाशिव जीवतोडे ( वय 45 वर्ष ), सोमेश्वर वाकडे ( वय 35 वर्ष ) यांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर उपचार सुरु आहेत. मात्र या तरुणांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

(नक्की वाचा- 'कपिल शर्माच्या शो'मध्ये काम देतो म्हणून सांगितलं,पुढे महिलेसोबत जे घडलं ते भयंकर होतं)

औषध देणारा वैद्य पोलिसांच्या ताब्यात 

दारू सोडण्याचे औषध देणारे वैद्य शेळके महाराज यांना समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहे. तपासाअंतीचा अहवाल समुद्रपूर पोलीस स्टेशनकडे पाठवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितलं.  

Advertisement

(नक्की वाचा- भावा-बहिणीने अश्लील व्हिडीओ पाहिला, त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरलं)

शेडेगाव येथील वैद्य शेळके महाराज यांच्याकडे दारू सोडवण्यासाठी अनेकजण येत असतात. या अगोदरही दारू सोडवण्याची औषध घेऊन आल्यानंतर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता स्थानिकांकडून मिळत आहे. त्यामुळे शेळके महाराज व त्याच्या दारू सोडवण्याचं औषध नेमकं काय आहे, याचा देखील तपास पोलीस करत आहेत. 

Topics mentioned in this article