सचिन कसबे, लोणावळा
लोण्यावळ्यातील भुसी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पाच जणांचा सध्या शोध सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटर फॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं. याठिकाणारून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
Advertisement
पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाच जण पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे. पाचही जणांचं शोधकार्य सध्या सुरू आहे. लोणावळा शहर पोलीस पथक आणि शिव दुर्ग रेस्कु टीम शोध घेत आहेत.
Topics mentioned in this article