जाहिरात
Story ProgressBack

लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; दोघांचा मृत्यू, 3 जणांचा शोध सुरु

रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ ही घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने हे कुटुंब पाण्यात वाहून गेलं आहे.

Read Time: 1 min
लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; दोघांचा मृत्यू, 3 जणांचा शोध सुरु

सचिन कसबे, लोणावळा

लोण्यावळ्यातील भुसी डॅम परिसरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भूशी डॅम परिसरात फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पाच जणांचा सध्या शोध सुरु आहे. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी कुटुंब लोणावळ्यात वर्षाविहारासाठी आले होते. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील रेल्वेचा वॉटर फॉल ओळखल्या जाणाऱ्या धबधब्याजवळ अन्सारी कुटुंब गेलं होतं. याठिकाणारून अन्सारी कुटुंब वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. 

पाण्याचा अंदाज न आल्याने हे पाच जण पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे. पाचही जणांचं शोधकार्य सध्या सुरू आहे. लोणावळा शहर पोलीस पथक आणि शिव दुर्ग रेस्कु टीम शोध घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पालघरमध्ये अल्पवयीन गर्भवती विवाहितेचा मृत्यू, पतीसह 10 जणांवर गुन्हा दाखल
लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले; दोघांचा मृत्यू, 3 जणांचा शोध सुरु
Entry ban for tourists in Tamhini area till September Forest department's decision
Next Article
ताम्हिणी परिसरात पर्यंटकांना संप्टेंबरपर्यंत प्रवेश बंदी; खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच निर्णय
;