Kalyan News Today : कल्याण पू्र्वेतील गोळवली परिसरात 8 मजली इमारत परनवानगी न घेता अनधिकृतपणे उभी केली आहे. जी प्लस सेव्हन अशाप्रकारचं या इमारतीचं बांधकाम असून या इमारतीला तीन विंग्स आहेत.धक्कादायक बाब म्हणजे,65 बेकायदा इमारतींचं प्रकरण सुरु असताना कोणतीही परवानगी न घेता ही इमारत उभी केली, असा आरोप वकिल रेश्मा भोपी यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत केडीएमसीकडे तक्रार करुनही कारवाई होत नाही. या प्रकरणात महापालिका आयुक्त संबंधितांच्या विरोधात कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका बेकायदा बांधकामामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. महापालिकेतील बेकायदा बांधकाम प्रकरणातील याचिका 2004 पासून न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेवरील सुनावणीसाठी नेमण्यात आलेल्या अग्यार समितीने दिलेल्या अहवालानुसार महापालिकेत 68 हजार बेकायदा बांधकामे आहे.
नक्की वाचा >> Nashik News : महिलेनं प्रियकर आणि भावाच्या मदतीने पतीला संपवलं, इनसाईड स्टोरी वाचून सर्वच थक्क
2024 मध्ये 65 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश
2022 मध्ये 65 बेकायदा इमारतीच्या प्रकरणाचा पर्दाफाश वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली. तसच त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाख केली. नोव्हेबर 2024 मध्ये 65 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या अवमान प्रकरणी पाटील यांनी पुन्हा याचिका दाखल केली आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात भयंकर घटना! 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने जीवन संपवलं, सुसाईड नोटमुळे उडाली खळबळ
65 बेकायदा बांधकाम प्रकरणी महापालिकेची परवानगी नसताना महापालिकेची खोटी परवानगी तयार करुन महारेराकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले होते.65 बेकायदा प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आत्ता गोळवलीतील 8 मजली बेकयदा इमारतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कोणतीही परवानगी न घेता ही इमारत उभारण्यात आली. वकिल भोपी यांनी याकडे लक्ष वेधले आहे.