जाहिरात

Nashik News : महिलेनं प्रियकर आणि भावाच्या मदतीने पतीला संपवलं, इनसाईड स्टोरी वाचून सर्वच थक्क

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथे एक भयानक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका बेपत्ता तरुणाच्या हत्येचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

Nashik News : महिलेनं प्रियकर आणि भावाच्या मदतीने पतीला संपवलं, इनसाईड स्टोरी वाचून सर्वच थक्क
Nashik Murder Case News

राहुल वाघ, प्रतिनिधी

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथे एक भयानक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका बेपत्ता तरुणाच्या हत्येचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पत्नीनेच प्रियकर आणि स्वतःच्या भावाच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी 7 जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी 2026 रोजी उगाव येथील तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शादाब रज्जाक तांबोळी असं या तरुणाचं नाव आहे. त्यानंतर 22 फ्रेब्रुवारी रोजी चांदवड तालुक्यातील परसुल गावाजवळील नदीत पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. 

नक्की वाचा >>  Pune News : पुण्यात भयंकर घटना! 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थीनीने जीवन संपवलं, सुसाईड नोटमुळे उडाली खळबळ

शादाबच्या हत्येसाठी मोठा कट रचला

मृतदेहाचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते. तसेच तोंडाला कपडा, कंबरेला आणि मांडीला डंबेल्स बार बांधून मृतदेह नदीत फेकण्यात आल्याची माहिती समोर आली.  तपासात हा मृतदेह बेपत्ता झालेल्या शादाब तांबोळी याचाच असल्याचे स्पष्ट झाले. मृत शादाबची पत्नी आरोपी मुस्कानचे मनमाड येथील ऋषभ वर्मा नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले.दोघांना लग्न करायचे होते, त्यामुळे त्यांनी शादाबचा काटा काढण्यासाठी कट रचला. यामध्ये पत्नीचा भाऊ आणि इतर साथीदारांनीही मदत केल्याचे उघड झाले.या प्रकरणी पत्नी मुस्कान तांबोळीसह 7 आरोपींना चांदवड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या पथकाकडून सुरु आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com