पावसात खेळू नकोस,पालकांनी खडसावले, 13 वर्षाच्या मुलीने थेट...

पाऊस जोरात असल्याने तिच्या पालकांनी तिला घरात येण्यास सांगितले. पावसाच्या पाण्यात खेळू नकोस असे तिचे पालक सांगत होते. पावसात खेळलीस तर तू आजारी पडशील असेही ते सांगत होते.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

राहुल कांबळे

पालकांनी मुलीला पावसात खेळू नकोस म्हणून सांगितले. याचा मुलीला राग आला. त्यानंतर तिने जे केलं त्यामुळे तिच्या पालकांचे टेन्शन मात्र वाढलं. ही मुलगी तेरा वर्षाची आहे. गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. अनेक जण पर्यटनासाठीही बाहेर पडत आहेत. तर लहान मुलं पावसात भिजण्याचा आनंदही घेत आहे. पण पावसाचा जोर वाढतच जात असल्याने पालक मुलांना पावसात जाण्यापासून अटकाव करत आहेत. अशीच एक घटना पनवेलच्या पेंढारमध्ये घडली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पनवेलच्या पेंढारमध्ये 19 जूनला जोरात पाऊस होत आहे. संध्याकाळचे साडेचार वाजले होते.  त्यावेळी एक 13 वर्षाची मुलगी पावसात खेळत होती. पाऊस जोरात असल्याने तिच्या पालकांनी तिला घरात येण्यास सांगितले. पावसाच्या पाण्यात खेळू नकोस असे तिचे पालक सांगत होते. पावसात खेळलीस तर तू आजारी पडशील असेही ते सांगत होते. त्याचा तिला भयंकर राग आला. शेवटी तिने नको तेच केले. घरच्यांचे लक्ष चुकवून तिने तिथून पळ काढला.  

ट्रेंडिंग बातमी - मोठी अपडेट! लाडकी बहीण योजनेत आता 6 नवे बदल, आता नव्या अटी-शर्ती

मुलगी घरात नाही हे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. पण शोधल्यानंतरही तिचा पत्ता लागला नाही. पालक यामुळे घाबरून गेले. त्यांनी तातडीने तळोजा पोलिस स्टेशन गाठले. तिथे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अविनाश काळदाते यांची भेट घेवून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर तळोजा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शिवाय मुलीचा शोधही सुरू केला आहे. मात्र तिचा अजूनही पत्ता लागू शकलेला नाही. 

Advertisement
Topics mentioned in this article