तो भिंतीवरून आला, तिला गच्चीवर घेवून गेला, हातपाय बांधले अन् पुढे...

उज्जैनी माता शाळेत एक 13 वर्षीय शाळकरी मुली बरोबर भयंकर कृत्य घडलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अहमदनगर:

अहमदनगर जिल्ह्यातील  पिंपळगाव उज्जैनी या गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संपुर्ण गाव हादरून गेले आहे. शिवाय गावात भितीचे वातावरणही आहे.  उज्जैनी माता शाळेत एक  13 वर्षीय शाळकरी मुली बरोबर भयंकर कृत्य घडलं आहे. शाळेत ती खेळत होती. त्यावेळी ती शौचालयात गेली. तिच्या बरोबर तिची मैत्रीणही होती. त्यानंतर मैत्रीण बाहेर आली. ही अल्पवयी आत एकटीच होती. त्याच वेळी शौचालयाच्या भिंतीवरून कोणीतरी आत घुसले. तिला काही समजण्याच्या आत तिचे हातपाय बांधले. त्यानंतर तिच्या तोंडालाही रूमाल बांधला. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आपल्या बरोबर काय होत आहे हेच तिला समजले नाही. शौचालयात कोणी तरी येईल या भितीने त्या मुलीला शाळेच्या गच्चीवर नेण्यात आले. तिथे तिचे पायही बांधण्यात आले. त्यानंतर ज्याने हे कृत्य केले त्याने कोणी तरी येईल या भितीने तिथून धुम ठोकली. रूमालाने तोंड बांधले असल्याने तिला ओरडताही येत नव्हते. पण तिने प्रयत्न केला. ती सरकात सरकत पुढे आली.  तिचा आवाज समोरच असलेल्या मैदानातील काही मुलांना ऐकू आला. गच्चीवर कोणी तरी आहे याची जाणीव मैदानात खेळत असलेल्या मुलांना झाली. त्यांनी गच्चीकडे धाव घेतली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?

जेव्हा ही मुले गच्चीवर गेली त्यावेळी त्यांना ही विद्यार्थीनी दिसली. तिचे तोंड रूमालाने बांधले होते. तिचे हात-पाय ही बांधले होते. त्याच अवस्थेत तिला तिथे सोडण्यात आले होते. सर्व जण आल्यानंतर मुलगी घाबरलेल्या आवस्थेत दिसली. तिची तिथुन सुटका करण्यात आली. तिथे उपस्थित असलेल्या मुलांनी तिला हे कोणी केले हे विचारण्याचा प्रयत्न केला. पण ती काही सांगण्याच्या स्थितीत नव्हती. ती जोरजोरात रडत होती. त्यानंतर या प्रकरणाची माहिती  एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवली योजना

उज्जैनी माता माध्यमिक विद्यालयात  इयत्ता आठवीच्या वर्गात ही  विद्यार्थिनी शिकत होती. अज्ञात व्यक्तीने हात व पाय बांधून, तसेच रुमालाने तोंड  बांधून शाळेच्या गच्चीवर ठेवले होते. 5 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच दरम्यान ही घटना घडली. शाळेत खेळाचा तास सुरू असताना मुलगी लघुशंकेसाठी शौचालयाकडे गेली होती. त्याच वेळी शाळेच्या संरक्षक भिंतीवरून येऊन अज्ञात इसमाने या विद्यार्थिनीस शाळेच्या गच्चीवर नेऊन बांधून ठेवले, असा अंदाज व्यक्त होत आहे. शाळा सुटल्यानंतर मैदानावर काही स्थानिक तरुण क्रिकेट खेळत होते. या युवकांनी मदतीसाठी हाक मारणाऱ्या या विद्यार्थिनीचा आवाज ऐकला व या मुलीची सुटका केली. या मुलीच्या सुटकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जिल्ह्यात खळबळ उडाली.
 

Advertisement