चक्क पोलिसांनाच झेड प्लस सुरक्षा देण्याची अजब मागणी, नक्की प्रकार काय?

पोलिसांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी झाली तर. तुम्हाला थोडं वेगळे वाटेल. पण हे खरं आहे. पोलिसांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तीही झेड प्लस सुरक्षा.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे 

पोलिसांकडून अनेकांना सुरक्षा पुरवली जाते. पण पोलिसांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी मागणी झाली तर. तुम्हाला थोडं वेगळे वाटेल. पण हे खरं आहे. पोलिसांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तीही झेड प्लस सुरक्षा. ही मागणी इंदापूरच्या  आरपीआयच्या आठवले गटाने केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विनोद रासकर तसेच लक्ष्मण सुर्यवंशी यांना तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आलीय. या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले होते. त्यांना संरक्षणाची गरज का आहे हेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा - गर्भपातादरम्यान मृत्यू, कारमधून महिलेचा मृतदेह शहरभर फिरवला; भयंकर प्रकार पाहून पोलिसही हादरले!

या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 24 मे 2024 रोजी इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यावर वाळू माफियांनी जिवघेणा हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. यानंतर पोलीसांनी तात्काळ काही आरोपींना ताब्यात घेतले. परंतु इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी विनोद रासकर आणि लक्ष्मण सुर्यवंशी हे रात्रंदिवस या वाळु तस्करांच्या मागावर असतात. काही ठिकाणी त्यांचा आमना-सामनाही होतो. त्यामुळे या दोन पोलीसांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या जिविताच्या रक्षणासाठी त्यांना ताबडतोब झेड प्लस दर्जाचे पोलीस संरक्षण द्या अशी मागणी आरपीआय आठवले गटाने केली आहे. 

हेही वाचा - प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली

शिवाय ते वापरत असलेल्या मोबाईल फोनचे व त्यांच्या नातेवाईकांचे मोबाईल फोनचे सी.डी.आर. तपासावेत. त्यांचे कॉल डिटेल्स ही तपासण्यात यावेत. त्यातून त्यांना वाळूमाफीयांच्या धमकी येत आहेत का याची माहिती मिळेल असेही या निवेदनात म्हटले आहे. ही सुरक्षा या दोन कर्मचाऱ्यांना पुरवले नाही तर इंदापूर पोलिस स्थानका बाहेर आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयने दिला आहे.  

Advertisement