जाहिरात

प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली

प्रेयसीबरोबर एक तरूण बोलत आहे हे पाहून प्रियकराने त्या तरूणाच्या अंगावर चारचाकी गाडीच चढवली आहे. यात तो तरूण गंभीर जखमी झाला आहे.

प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली
पिंपरी चिंचवड:

पुण्यात पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच बाजूच्या पिंपरी चिंचवडमध्येही एक धक्कादायक घटना घडली आहे. यात प्रेयसीबरोबर एक तरूण बोलत आहे हे पाहून प्रियकराने त्या तरूणाच्या अंगावर चारचाकी गाडीच चढवली आहे. यात तो तरूण गंभीर जखमी झाला आहे. अंगावर गाडी घालणाऱ्या प्रियकरालाही गजाआड करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री हा प्रकरा घडला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहराच्या यशवंत नगर येखीली शंकर चौधरी चौक परिसरात एका तरुणाने आपली प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचं पाहीले. त्यामुळे प्रियकराला राग अनावर झाला. त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता त्या तरूणाच्या अंगावर चारचाकी घातली. यात तो तरूण जबर जखमी झाला आहे. त्याला तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाय. सी. एम. रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Latest and Breaking News on NDTV

हेही वाचा - जव्हारमध्ये दोन गाड्यांचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू; 11 जखमी

सुशील काळे असे अंगावर चारचाकी गाडी घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर या अपघातात निलेश शिंदे हा तरुण जखमी झाला आहे. आपली प्रेयसी निलेश शिंदे या तरुणासोबत बोलत थांबल्याचे पाहून सुशील काळेला राग अनावर झाला. त्याने आपली चार चाकी गाडी त्याने निलेश शिंदे यांच्या अंगावर घातली. दरम्यान या प्रकरणावरून पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे यांच्या विरोधात 307 अंतर्गत खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली
central Government approves Rs 2817 crore Digital Agriculture Mission for farmers PM modi
Next Article
केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना भेट, 7 मोठ्या योजनांची घोषणा