Ashok Kharat: "ते पकडले गेल्यावरच भोंदू ठरतात का?" अतुल कुलकर्णींची विचार करायला लावणारी पोस्ट

Ashok Kharat Case: प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 'श्रद्धा आंधळी कधी होते?' असे प्रश्न विचारत भक्तांच्या जबाबदारीवर बोट ठेवले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ashok Kharat Case: नाशिकच्या अशोक खरात ऊर्फ 'कॅप्टन' या भोंदू बाबाच्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आता सिनेसृष्टीतूनही तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विचारलेल्या धारदार प्रश्नांनी केवळ भोंदूगिरीवरच नाही, तर सध्याच्या राजकीय संस्कृतीवरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत समाजमनाला विचार करायला भाग पाडले आहे.

काय आहे अतुल कुलकर्णी यांची ती पोस्ट?

पकडले गेले कीच आणि तरच 'भोंदू'? 
त्या आधी ते काय असतात? 
आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?
ज्या वेळी कुणी 'महाराज' भाोंदू 'निघतात, तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात-भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?
श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय ? 
डोळस आणि अंध श्रद्धांमध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? 
अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते ?
हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?

Advertisement

(नक्की वाचा-  Ashok Kharat: नवऱ्याला बाहेर बसवून गर्भवती पत्नीला कॅबिनमध्ये बोलावलं अन्... अशोक खरातचं संतापजनक कृत्य)

राजकारण्यांवर ओढले ताशेरे

अशोक खरातच्या संपर्कात अनेक बडे राजकारणी असल्याचे समोर आले आहे. रुपाली चाकणकर यांचा राजीनामा आणि इतर नेत्यांचे खरातसोबतचे फोटो या पार्श्वभूमीवर अतुल कुलकर्णी यांची पोस्ट 'राजकीय अंधश्रद्धे'कडेही अंगुलीनिर्देश करते. राजकारणातही लोक नेत्यांकडे डोळे झाकून पाहतात का, असाच काहीसा सूर या पोस्टमधून उमटत आहे.

(नक्की वाचा-  Ashok Kharat: अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; मविआ सरकारही भोंदूबाबावर मेहेरबान असल्याचे समोर)

अतुल कुलकर्णी यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी "सध्याच्या काळात असे प्रश्न विचारण्याची हिंमत हवी," अशा कमेंट्स केल्या आहेत. खरातसारख्या भोंदूंना वेळीच ओळखण्यात समाज का अपयशी ठरतो, हा अतुल कुलकर्णींचा प्रश्न आता पोलीस तपासाइतकाच महत्त्वाचा ठरत आहे. 

Topics mentioned in this article