केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने नुकत्याच केलेल्या तीन स्वतंत्र राष्ट्रीय मूल्यमापनांमध्ये अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. ने पुन्हा एकदा सर्वोच्च मानांकने मिळवून आपली उत्कृष्टता सिद्ध केली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या तेराव्या एकात्मिक मानांकन उपक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कंपनीला पहिले मानांकन मिळाले होते. सर्वोत्तम ग्राहक सेवेसाठी रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनच्या डिस्कॉम ग्राहक सेवा मानांकनात ए प्लस हे मानांकन मिळाले होते. त्यापाठोपाठ आता पहिल्यावहिल्या वितरण कंपनी मानांकन अहवाल 2023-24 मध्ये देशातील पहिल्या क्रमांकाची नागरी आणि एकंदर ऊर्जा कंपनी असे मानांकन मिळाले आहे. यामुळे अदाणी इलेक्ट्रिसिटीने कामकाजातील उत्कृष्टता, ग्राहककेंद्री सेवा आणि पर्यावरणपूरकता या तिन्ही विभागात आपली असामान्य कामगिरी दाखवून दिली, असे सांगितले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डीयूआर अहवाल
डीयूआर अहवालासाठी कंपन्यांचे सर्वांकष मूल्यांकन करावे लागते. त्यात यापूर्वीच्या मूल्यांकनाचा तपशील तसेच एकात्मिक मानांकन पाहणी आणि सीएसआरडी अहवाल तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा खरेदी बंधनांचे पालन, सहजसंवादी मीटरिंग सिस्टीम, मागणीचे योग्य व्यवस्थापन, साधन संपत्तीचे परिपूर्ण नियोजन या अतिरिक्त महत्त्वाच्या मानकांचाही समावेश केला जातो. या मूल्यमापनामुळे ऊर्जा निर्मिती कंपन्यांना कामकाजामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतत विकास करण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल सोपी होते.
कशी आहे अदाणी इलेक्ट्रिसिटीची कामगिरी?
डीयूआर अहवालातील अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या असामान्य कामगिरीमुळे त्यांची अनेक बाबीतील सर्वोत्तम कामगिरी दिसून आली. या मानांकनात 93.5 एवढे एकत्रित गुण मिळवताना अदाणी इलेक्ट्रिसिटीने अन्य सर्व नागरी ऊर्जा कंपन्यांना मागे टाकले आहे. यातच, अदाणी इलेक्ट्रिसिटीला सर्वोत्कृष्ट कामकाज (99.8 गुण), ग्राहक सेवा (90), पर्यावरणपूरक ऊर्जा खरेदी निर्बंधांचे पालन (100 टक्के), सहजसंवादी मीटरिंग यंत्रणा (100 टक्के), आणि साधन संपत्तीचे परीपूर्ण नियोजन (91.7) या गटांमध्येही सर्वोच्च स्थान मिळाले आहे. एवढे सर्वोत्तम गुण मिळाल्याने कंपनीची कामकाजातील विश्वासार्हता, ग्राहकांचे समाधान होण्याबाबतचा निर्धार आणि वीज पुरवठ्यात पर्यावरणपूरक ऊर्जेचे स्रोत एकत्रित करण्यातील नेतृत्व अधोरेखित होते, असे दाखवून दिले जात आहे.
( नक्की वाचा : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई बनली देशातील पहिल्या क्रमांची वीज कंपनी! ऊर्जा मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब )
अदाणी इलेक्ट्रिसिटीने, सहजसंवादी मीटरिंग यंत्रणा बसवण्यात शंभर टक्के गुण मिळवल्याने डिजिटल परिवर्तनात त्यांनी मिळवलेले यशच यातून दिसून येते. अदाणी इलेक्ट्रिसिटीने त्यांच्या सर्व फिडर्समध्ये आणि वितरण ट्रान्सफॉर्मर मध्ये सर्वत्र असे मीटर बसवले आहेत. तर वीज पुरवठ्यात पर्यावरणपूरक ऊर्जेचे स्रोत एकत्रित करण्यातही त्यांना शंभर टक्के गुण मिळाल्याने स्वच्छ ऊर्जा वापरण्याचे त्यांचे उद्दीष्ट तसेच हरित आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचे भविष्य निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय परिवर्तित होत आहे, असेही सांगितले जात आहे.
काय आहे पुरस्काराचे महत्त्व?
अदाणी इलेक्ट्रिसिटीला सतत मिळणारा पहिला क्रम याचा अर्थ विश्वासार्ह आणि अखंड वीजपुरवठा, ग्राहक सेवेतील तक्रारींचे सुलभ निवारण, पारदर्शक आणि अचूक बिलिंग यंत्रणा आणि सोयीस्कर असा डिजिटल संवाद, असा होतो. तर हे मानांकन मिळाल्याने राष्ट्रीय पातळीवरही अदाणी इलेक्ट्रिसिटीने या उद्योगात नवे मापदंड निश्चित केले आहेत व त्यायोगे कामगिरीत उत्कृष्टता कशी दाखवावी, ग्राहक केंद्र कामकाज कसे असावे, हे तर त्यांनी दाखवून दिले आहेच, पण पर्यावरणपूरक ऊर्जेचे एकत्रीकरण हे भारताच्या ऊर्जा क्षेत्राचे क्षितिजच बदलून टाकतील व त्याद्वारे स्वच्छ उर्जेकडे होणाऱ्या संक्रमणाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळ मिळेल, असा याचा अर्थ आहे.
अग्रणी कंपनीची प्रतिक्रिया
सतत तीन राष्ट्रीय प्रतिष्ठित मूल्यमापनात मिळालेला पहिला क्रमांक ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून ही बाब आम्ही नम्रपणे स्वीकारतो. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणे, ग्राहकांचे समाधान होईल याकडे प्राधान्याने लक्ष देणे आणि पर्यावरणपूरकता यांच्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर या मानांकनांमुळे शिक्कामोर्तब झाले आहे, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल म्हणाले.
पर्यावरणपूरक ऊर्जेचे एकत्रीकरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवेचे मापदंड सतत उंचावित नेणे ही ध्येये गाठण्यासाठी, समाजाचे सक्षमीकरण करणे आणि देशाच्या पर्यावरणपूरक वाढीला पाठिंबा देणे यावरील आमचा दृढ विश्वास कारणीभूत ठरला आहे. जास्त स्मार्ट, स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा सेवा पुरवण्यासाठी तसेच सर्वांचे भवितव्य उज्वल असावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
अदाणी इलेक्ट्रिसिटी आपल्या स्वतःच्याच प्रयत्नामुळे आघाडीवर आहे. आधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक, पायाभूत सुविधांमध्ये विकास आणि पर्यावरणपूरक कामकाज पद्धती, यावर भर देऊन आम्ही पर्यावरण पूरकदृष्ट्या जबाबदार आणि ग्राहकांवर भर देणाऱ्या मुंबईच्या आणि देशाच्या ऊर्जा भवितव्याची पायाभरणी केल्याचेही पटेल यांनी सांगितले.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)