
अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. (एईएमएल) ला उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि सर्वोत्तम कामगिरीसाठी देशातील सर्वोत्तम वीज वितरण कंपनी म्हणून स्थान मिळाले आहे. ऊर्जा मंत्रालयाने या दोन बाबींचे निकष लावून केलेल्या पाहणीनंतर हे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
यामुळे सलग तिसऱ्या वर्षी एईएमएलने आपला पहिला क्रमांक कायम राखताना, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने 13 एकात्मिक बाबींसाठी केलेल्या पहाणीत आघाडी मिळवली आहे. यात एईएमएलचे अजोड असे आर्थिक स्थैर्य विशेष करून उठून दिसले. त्याखेरीज कंपनीला डिस्कॉमच्या ग्राहक सेवा मानांकन विभागात आर्थिक वर्ष 2023-24 च्या आर इ सी अहवालात सर्वोच्च ए प्लस मानांकन देण्यात आले. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्याच्या क्षेत्रातील प्रमुख स्थानही कंपनीने पुन्हा मिळवले. या दोन्ही बाबींमध्ये मान्यता मिळाल्याने, ग्राहकांना विश्वासार्ह, सातत्यपूर्ण आणि ग्राहककेंद्री ऊर्जा सेवा देण्याच्या अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या निश्चयाचे प्रतिबिंब त्यात पडल्याचे मानले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसे दिले जाते मानांकन?
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची, एकात्मिक मानांकन आणि क्रमवारी ही भारतातील ऊर्जा कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीची आणि प्रत्यक्ष कामकाजाची सर्वात महत्वपूर्ण तपासणी आहे. वीज कंपन्यांचे आर्थिक स्थैर्य, कामकाजातील उत्कृष्टता, बाह्य वातावरण आणि अन्य महत्त्वाचे कामकाजाचे मुद्दे यात विचारात घेतले जातात.
डिस्कॉम च्या ग्राहक सेवा मानांकनाच्या अहवालाचे हे चौथे वर्ष असून त्यात प्रामुख्याने ग्राहक सेवेतील उत्कृष्टतेवर भर दिला जातो. यासाठी त्या वीज कंपनीची कामकाजातील विश्वासार्हता, जोडण्या तसेच अन्य सेवा, मीटरिंग, बिलिंग आणि वसुली तसेच दोष निवारण आणि तक्रारींची सोडवणूक या महत्त्वाच्या मुद्द्यांची पाहणी केली जाते. यामुळे ग्राहकांच्या सेवेसाठी सतत प्रयत्न करून ग्राहकांचे समाधान वाढवण्यास वीज कंपन्यांना प्रोत्साहन मिळते.
( नक्की वाचा : अदाणी समूह सुरू करणार भारतातील सगळ्यात मोठा कौशल्य आणि रोजगार उपक्रम, मेक इन इंडिया उपक्रमाला मिळणार बळकटी )
मुंबईत सुमारे ३० लाख ग्राहकांना सेवा देणारी अदाणी इलेक्ट्रिसिटी ही सीएसआरडी अहवालात ए प्लस मानांकन मिळवणारी देशातील सहा डिस्कॉमपैकी एक कंपनी आहे. कंपनीने कामकाजातील विश्वासार्हता आणि तक्रार निवारण याबाबत मानकांपेक्षाही जास्त चांगली कामगिरी केली आहे. त्यांना ग्राहकांच्या मिळालेल्या प्रतिसादातून हेच दिसून येते.
अदाणी इलेक्ट्रिसिटी च्या कल्पक आणि नवकल्पनायुक्त कामकाजात वीज गेल्याच्या तक्रारीची शंभर टक्के वेळेत सोडवणूक आणि 87 % बिलांचे डिजिटल पेमेंट यांचा समावेश आहे. एकात्मिक मानांकन पाहणीत अदाणी इलेक्ट्रिसिटीने आर्थिक व्यवस्थापनाचा उत्कृष्ट मापदंड सादर केला. तसेच वेगवान थकबाकी वसुली आणि कामकाजातील उत्कृष्टता दाखवून देशातील सर्वात उत्तम वीज कंपनी हे स्थान मिळवले.
मुंबई आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्व
एईएमएलला मिळालेली ही मान्यता म्हणजे मुंबईकरांना देशाच्या सर्वोत्तम अशा आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि ग्राहककेंद्री कंपनीने, वीज पुरवठा खंडित होण्याच्या कमीत कमी घटना घडणे, त्वरेने तक्रार निवारणाची हमी, पारदर्शक बिलिंग व्यवस्था आणि सोयीस्कर डिजिटल पेमेंट यंत्रणा यांची दिलेली खात्री आहे.
राष्ट्रीय स्तरावर अदाणी इलेक्ट्रिसिटीने हा बहुमान मिळाल्याने नवीन मापदंड स्थापित केले आहेत. तसेच सबळ आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांना महत्व देणारी सेवा असेल तर देशाचे वीज वितरण क्षेत्र जास्त विश्वासार्हता कार्यक्षमता आणि स्थिरता यांच्या दिशेने वाटचाल करेल, हेच यातून दिसून येते.
'हा आमचा सर्वोच्च बहुमान'
आर्थिक स्थिरता आणि ग्राहक सेवेतील उत्कृष्टता यात देशात अग्रस्थान मिळणे हे आम्ही नम्रपणे स्वीकारतो. पण हा आमचा सर्वोच्च बहुमान आहे, असे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प पटेल यांनी सांगितले. ग्राहक सेवेसाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना या मान्यतांमुळे बळ मिळाले असल्यामुळे त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीचे, समाजाचे आणि व्यवसायांचे आयुष्य उजळून टाकणारी वीज ही प्रत्येक माणसासाठी रोजच महत्त्वाची आहे.
आमच्या या प्रवासात आम्ही स्वच्छ ऊर्जेचे स्रोत मिळवण्यासाठी, तसेच आमच्या सेवेत नवकल्पना आणण्यासाठी आणि आणखीन उच्च मानके स्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे ध्येय स्पष्ट आहे - सर्वोत्तम ते देणे, विश्वास मिळवणे आणि देशाच्या हरित आणि उज्वल ऊर्जा भविष्यासाठी प्रत्यक्ष सहभाग देणे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world