Story of Suraj: कहाणी सूर्याची! अदाणी समूहाने प्रसिद्ध केला तिसरा लघुपट

ऊर्जा, लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि समुदाय विकास या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अदाणी समूहाने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारतातील सर्वात मोठा आणि वेगाने वाढणारा एकात्मिक पायाभूत सुविधा समूह, अदाणी समूह (Adani Group), देशभरात सौर ऊर्जा पोहोचवून लोकांचे जीवन उज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा अदाणी समूहाने प्रयत्न केला असून याच प्रयत्नांचा 'हम करके दिखाते हैं' (#HumKarkeDikhateHain) मोहीम एक भाग आहे. या मोहिमेतील तिसरा लघुपट स्टोरी ऑफ सूरज प्रदर्शित करण्चा आला आहे.  

ऊर्जा, लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि समुदाय विकास या क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अदाणी समूहाने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे. देशाच्या शाश्वत आणि दीर्घ विकासासाठी अपारंपरीक उर्जेची प्रचंड मोठी गरज आहे. ही गरज पूर्ण करण्याचा अदाणी समूह प्रयत्न करत आहे. लोकांचे जीवनमान सुधारावे आणि लोकांसोबतच देशातही समृद्दी नांदावी हा प्रामाणिक हेतू या सगळ्या प्रयत्नांमागे आहे. अपारंपरीक उर्जेमध्ये सौरउर्जेचे मोठे महत्त्व आहे. अदाणी समूहाने केलेल्या प्रयत्नांमुळे सौर उर्जा निर्मितीतून शहर कसे उजळते आणि लाखो लोकांची त्यामुळे स्वप्ने पूर्ण होण्यास कसा हातभार लागतो हे या लघुपटातून दाखवण्यात आले आहे. राकेश नावाची व्यक्ती बऱ्याच वर्षांनी आपल्या शहरात परत येतो. परत आल्यानंतर सौर ऊर्जेमुळे झालेल्या आमूलाग्र बदलांमुळे तो आस्चर्यचकीत होतो. पीके, शाळा, रुग्णालये आणि लोकांचे जीवनमान या सगळ्यांत मोठा बदल झालेला त्याला दिसतो.  

Advertisement

'बधाई हो' या सुपरहिट चित्रपटाचे प्रशंसित चित्रपट दिग्दर्शक अमित शर्मा (Amit Sharma) यांनी क्रोम पिक्चर्सच्या माध्यमातून ही कथा लघुपटात उतरवण्यात आली आहे.  ओगिल्वी इंडियाने संकल्पित केलेला हा चित्रपट अदाणीच्या स्वच्छ ऊर्जा मिशनचा मानवी पैलू दर्शवण्याचे काम करतो. अदाणी समूहाचे कॉर्पोरेट ब्रँडिंग प्रमुख श्री. अजय काकर यांनी म्हटले की, "अदाणी समूहात आम्ही वीजनिर्मिती करण्यासोबतच प्रगतीचे पथही निर्माण करत आहोत. हा लघुपट सौर ऊर्जेचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम दर्शवतो. एका शहराचे परिवर्तन हे आम्ही संपूर्ण भारतात घडवून आणत असलेल्या बदलाचे प्रतीक आहे."

ओगिल्वी इंडियाचे मुख्य सल्लागार श्री. पीयूष पांडे (Piyush Pandey) यांनी म्हटले की, "अदाणी समूहाने सौर उर्जेवर तयार केलेल्या या लघुपटाद्वारे तंत्रज्ञानाला मानवी चेहरा देण्याचे काम केले आहे. सौर उर्जेमुळे व्यक्तींच्या आयुष्यात, समाजात आणि शहरात कसा उत्तम बदल होत जातो हे या लघुपटातून दाखवण्यात आले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article