दोन दिवसांच्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ

तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे.

Advertisement
Read Time: 1 min
पुणे:

गेल्या दोन दिवसांपासून पुण्याला मुक्कामी असलेली तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी होती. त्यानंतर आज पुणे शहरातून प्रस्थान ठेवल्यावर तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा मुक्काम लोणी काळभोर येथे असणार आहे. पुन्हा एकदा भाविकांनी विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करीत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. 

जगद्गुरु संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे देहू आणि आळंदी या ठिकाणावरून प्रस्थान झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पुण्यामध्ये या दोन्ही पालख्या मुक्कामी होत्या. त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण पुण्यनगरी सजली होती. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.

या पालखीत लाखो वारकरी माऊली - तुकोबांचा जयघोष करत पंढरीच्या वाटेला निघाले आहेत. संत तुकाराम महाराज यांचे देहुतून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदीतून प्रस्थान झालेल्या पालख्यात पुण्याच्या मुक्कामानंतर पंढरपुराकडे करतात.