Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत, दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटे आणि त्यांचं बंधू भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.  

जाहिरात
Read Time: 1 min

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या बेताल वक्तव्यामुळे कमी वेळेत अनेकदा चर्चेत आले आहेत. आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे चर्चे आले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना  नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने ते अडचणीत सापडले आहेत. 

माणिकराव कोकाटे आणि त्यांचं बंधू भाऊ विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा कोर्टाने सुनावली आहे.  

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात ही शिक्षा झाली आहे. 1995 ते 97 सरकारच्या 10 टक्के कोट्यातून घर घेतल्याचे त्यांचावर आरोप आहेत. भादवी 420, 465, 471,47 अन्वये त्यांच्या गुन्हा दाखल होता.