- अहमदाबादहून लंडनसाठी निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787 विमानाचा टेकऑफनंतर लगेच अपघात झाला होता
- २२ वर्षांच्या एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील या विमान अपघातात मृत्यूमुखी पडल्या होत्या
- मैथिलीच्या कुटुंबियांनी तिची बॅग सहा महिन्यांनी मिळाली ज्यात तिच्या बालपणीच्या वस्तू आणि फोटो होते
राहुल कांबळे
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून लंडनसाठी एअर इंडियाचं बोईन 787 विमान रवाना होणार होते. सर्व तयारी पूर्ण झाली होती. सर्व प्रवाशी विमानात होते. प्रतिक्षा विमान उड्डाणाची होती. विमान दुपारी 1.38 ला विमानाने उड्डाण केलं आणि पाहाता पाहाता डोळ्यासमोर काही सेकंदात हे विमान कोसळलं. आगीचा मोठा गोळा डोळ्या समोर आला. होत्याचं नव्हतं झालं. क्षमात काही संपलं होतं. विमानातल्या सर्व प्रवाशांचा जागीच कोळसा झाला होता. त्या पैकीच एक होती मैथिली मोरेश्वर पाटील. अवघ्या 22 वर्षांची मैथिली या विमानात एअर हॉस्टेस होती. तिला जावून आज एक वर्ष झालं. पण तिचे कुटुंबीय आज ही ती परत येईल या प्रतिक्षेत दाराकडे डोळे लावून बसले आहेत.
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उरण तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि 22 वर्षीय एअर होस्टेस मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला टेकऑफनंतर काही क्षणांतच अपघात झाला. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, काळ पुढे सरकला असला तरी मैथिलीच्या कुटुंबाच्या मनातील वेदना आजही तितक्याच तीव्र आहेत. तिच्या आठवणींनी घरातले आजही भावूक होतात. तिची एक बॅग एअर इंडियाने सहा महिन्यानंतर तिच्या कुटुंबीयांना दिली. त्यात तिची बालपणीची भातुकलीची खेळणी, मोराचं पिस, आपट्याचं पान, जपून ठेवलेल्या वस्तू आणि तिचे फोटो आहे. ते पाहूनच तिचे कुटुंबीय वर्षभरापासून जगत आहे.
मैथिलीची आजी इंदिरा भोईर यांचा तिच्यावर खूप जिव होता. मैथिलीच्या आठवणीत त्यांना आश्रू अनावर झाले. त्या म्हणतात मैथिली गेली नाही असं वाटतं. ती इथेट कुठे तरी अजूबाजूला आहे असं वाटतं. हाक मारली की येईल. पण ती काही दिसत नाही. आवाज पण देत नाही. स्वप्नात पण येत नाही असं त्या म्हणाल्या. तिचं सामान पाहात असतो. त्यात आपट्याचं पान आहे. पण ती इथं नाही. तिची बॅग आम्हाला दहा महिन्याने मिळाली. त्याच तिचं बरचं सामान आहे. ते आम्ही पाहात असतो. मैथिली येईल असं वाटतं पण ती येत नाही. कोणाकडे काय मागणी करणार. मागणी केली तरी ते तिला परत आणून देणार आहेत का? गेली आमची मैथिली असं इंदीरा भोईर म्हणाल्या.
मैथिलीची आई प्रमिला पाटील यांना तर शब्दच फुटत नाही. काय बोलावे हे समजत नाही. सोन्या सारखी मुलगी गेली. आमची आता काहीच मागणी नाही. पण हो अपघाताची चौकशी झाली पाहीजे. असं का झालं ते समजलं पाहीजे. कारण पुन्हा असं कोणात्या मुलीसोबत होवू नये असं त्यांनी आवर्जून सांगितलं. त्या म्हणतात या घटनेने आमचे आयुष्यच जणू थांबून गेले आहे. तिची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत आहे. तिला जावून एक वर्ष उलटूनही दुःखाचा डोंगर कमी झालेला नाही. कुटुंबीय अजूनही त्या काळजाला चिरून जाणाऱ्या क्षणातून बाहेर पडू शकलेले नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world