Ahmedabad Plane Crash : अहमदाबादसारखी घटना घडली तर... 'या' मुंबईकरांची उडालीय झोप! वाचा Ground Report

जाहिरात
Read Time: 2 mins
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमधील घटनेनंतर 'या' मुंबईकरांची झोप उडाली आहे.
मुंबई:

अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमानाच्या झालेल्या अपघातानं संपूर्ण देश हादरला आहे. अहमदाबादहून लंडनला निघालेलं हे विमान गुरुवारी (12 जून 2025) विमानतळावरुन उड्डाण घेताच काही क्षणात कोसळलं. विमानतळाच्या जवळच्या भागातच हे विमान कोसळलं. या घटनेनंतर मुंबई विमानतळाच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांचं टेन्शन वाढलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कुर्ला इथल्या फनेल झोन मधल्या नागरिकांना अहमदाबादच्या दुर्घटनेनंतर आपल्या घरी राहण्याची भीती वाटू लागली आहे. त्यांच्या घरावरून डोक्यावरून प्रतिमिनिटाला विमान फिरत असतात. सततच्या येणाऱ्या आवाजाने ह्या नागरिकांच्या अक्षरशा कानठळ्या बसतात. रात्री सगळं शांत असतानाही विमानांची वर्दळ सुरुच असते. त्याचा देखील या नागरिकांना त्याचा त्रास होतो. या परिस्थितीमध्ये आपल्याला राहण्याची इच्छा नाही, असं मत या नागरिकांनी व्यक्त केलंय.

सरकारनं आमचं स्थलांतर करावं, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. काही प्रमाणामध्ये या परिसरातल्या नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे परंतु अजूनही काही नागरिकांचा स्थलांतर बाकी आहे. याबाबत वारंवार अडचणी मांडूनही सरकार ऐकत नाही, अशी खंत या नागरिकांनी व्यक्त केलीय. 

( नक्की वाचा : Ahmedabad Plane Crash: मुलाला वाचवण्यासाठी आगीची पर्वा न करणारी आई, 'हा' Video पाहून अंगावर येईल काटा )
 

अहमदाबादमध्ये जी दुर्घटना घडली ती दुर्दैवाने इथेही घडू शकते अशी ही भीती इथल्या नागरिकांमध्ये आहे. डोक्यावरून इतक्या जवळून विमान जातं. त्याच्या आवाजाचा त्रास होतो. या परिसरात लहान मुलं खेळत असतात. दुर्दैवाने एखादं विमान पडलं तर अशा स्थितीत आम्ही काय करायचं? असा प्रश्न येथील रहिवाशी विचारत आहेत. 

Advertisement

फनेल झोन म्हणजे नेमकं काय?

फनेल झोन म्हणजे विमानतळाभोवतीचा एक विशिष्ट हवाई क्षेत्र, जो सुरक्षित विमान उड्डाण आणि लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी नियुक्त केला जातो. हा झोन मूलतः एक हवाई कॉरिडॉर आहे, जो रस्त्याच्या वाहतुकीसाठी असलेल्या लेनसारखाच असतो. या भागात विमानांनी त्यांना निश्चित केलेल्या मार्गावरुनच उड्डाण करणे अपेक्षित असते. या झोनमध्ये विमानांच्या ऑपरेशन दरम्यान अडथळा टाळण्यासाठी इमारतींना उंचीचे बंधन असते.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतीचा एअर फनेल झोन हे एक प्रमुख उदाहरण आहे. मुंबईच्या उपनगरातील मोठ्या भागात हा फनेल झोन पसरला आहे. , फनेल झोनमधील उंचीच्या निर्बंधांमुळे प्रभावित झालेल्या विकासकांना किंवा रहिवाशांना भरपाई देण्यासाठी विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) सारखी धोरणे लागू केली जाऊ शकतात. त्यामध्ये त्यांना उंचीचे नियम शिथिल असलेल्या भागात बांधकाम हस्तांतरित करण्याचा अधिकार देता येतो.  

Advertisement
Topics mentioned in this article