Ajit Pawar : जीवात जीव आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही : अजित पवार

चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही. आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो. कुणी गैरसमज निर्माण केले तर आमचा महायुतीवर विश्वास आहे असं सांगा, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा आज बारामतीत पार पडला. या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर पावसात भाषण केले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या योजनाचा पाढा अजित पवारांनी वाचला. विरोधकांकडून सरकारी योजनांवर होणाऱ्या टिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. विधानपरिषदेच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा खोटा प्रचार 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्ही विकासावर बोलत होते. तर विरोधक खोटा प्रचार करत होते. त्यावेळी वेगळं वातावरण करण्याचा प्रयत्न झाला. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आम्ही इंदू मिलमध्ये उभारत आहोत. संविधान दिन साजरा केला. मात्र हे 400 पार झाले तर संविधान बदलतील असा खोटा प्रचार आमच्याविरोधात (महायुती) करण्यात आला.

कुठल्याही परिस्थिती संविधानाला आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत धक्का लागू देणार नाही. चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही. मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो. कुणी गैरसमज निर्माण केले तर आमचा महायुतीवर विश्वास आहे असं सांगा, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रात कुणावरही अन्याय होणार नाही- अजित पवार

शाहु-फुल-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ असा शब्द मी देतो, असं अजित पवार यांनी म्हटलं. सत्ता येत सत्ता जाते. सत्तेसाठी आम्ही हापापलेलो नाहीत. मिळालेल्या सत्तेचा वापर गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी झाला पाहिजे. कालच मी अमित शाह यांना भेटलो.  आरक्षणाबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही,  असं अजित पवार यांनी म्हटलं.

Advertisement

महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं आहे. आम्ही कुठेही कांदा आयात केला नाही. दुधाची पावडर आयात केली नाही. दुधाचे दर वाढत नाही तोपर्यंत प्रतिलिटरला सरकारने 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील लोकांना ही भाजीपाला दूध वाजवी दरात मिळाला पाहिजे. पण शेतकऱ्यालाही त्याची चांगली किंमत मोबदला मिळाला पाहिजे. उसाचा एफआरपी वाढला मात्र एमएसपी गेल्या अनेक वर्षात वाढला नव्हता. अमित शाहांना मी एमएसपीबाबत लेखी निवेदन पाठवणार आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

येणाऱ्या काळात महायुतीच्या संयुक्त सभा 

आजची सभा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. पण यापुढे महायुतीच्या संयुक्त सभा होतील. विधानसभा निवडणुकीपर्यंत या सभा सुरु राहतील. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाला प्राधान्य दिले, विकासाला डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस काम करत राहील. हाच झंजावात आपल्याला चालू ठेवायचा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं. 

Advertisement