"तुम्ही फोटो काढता, आम्हाला किंमत मोजावी लागते", अजित पवार असं का म्हणाले?

च वाल्मिक कराडचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत. यावरुन राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी, "आम्हाला याची किंमत मोजावी लागते, त्यामुळे काळजी घ्या" असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा देखील या हत्याप्रकरणात हात असल्याचा आरोप होत आहे. याच वाल्मिक कराडचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो आहेत. यावरुन राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी, "आम्हाला याची किंमत मोजावी लागते, त्यामुळे काळजी घ्या" असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अजित पवार यांनी म्हटलं की, "सगळ्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो. पण फोटो नाय काढून दिला तर नाराज होतात.  गडी बदलला असे म्हणतात. अशातच एखादा नवीन गडी येतो फोटो काढून जातो आणि वाटच लागते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील आमच्यासोबत कोण फोटो काढतय याची आम्हाला कल्पना द्यावी." 

(नक्की वाचा-  Walmik Karad : "पोते भरुन पैसा, 140 जणांकडून कोट्यवधी हडपले", वाल्मिक कराडचा नवा कारनामा उघड)

अजित पवारांनी वाल्मिक कराड याच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटो प्रकरणावरूनही भाष्य केलं. सध्या राजकारण काय चाललं आहे ते पाहा. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचे फोटो आहेत. त्यामुळे यदा कदाचित कोणाचा चुकीचा फोटो माझ्यासोबत आला, तर ते मला माहिती नव्हतं, तो चुकून काढला आहे असं मी सांगेल.

(नक्की वाचा- Solapur News: वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत! मॅनेजरच्या पत्नीने केले गंभीर आरोप; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून...)

आम्ही पोलिसांना देखील सूचना दिल्या आहेत. दोन नंबर वाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातील लोकांना आमच्यापासून लांब ठेवा. याची आम्हाला मोठी किंमत देखील मोजावी लागते, असं देखील अजित पवार यांनी म्हटलं. 

Advertisement

Topics mentioned in this article