'दादांच्या पायातून धुर येत होता, एक जण खाली उतरत होता' काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' प्रसंग

पण ते अजित दादाच आहेत यावर आमचा विश्वास बसत नव्हता. आम्हाला ते खरचं वाटत नव्हतं असं ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
बारामती:

मोसिन शेख 

Ajit Pawar Plane Crash Eyewitness: अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरण्या ऐवजी खाली कोसळले. त्याच्या बाजूलाच गोजूबावी गाव आहे. याच गावातले गावकरी अपघात स्थळी सर्वात आधी पोहोचले. पण तिथं सर्वात पहिले जर कुणी पोहचले असेल तर ते होते गावचे माजी सरपंच कल्याण अटोळे होते. त्यांनी तिथं काय पाहीलं त्याची सविस्तर आणि तितकीच थरारक माहिती NDTV मराठीला दिली आहे. काळजाचा ठोका चुकवणाराच तो क्षण होता असं ही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी तिथे जे काही पाहीलं त्याचं खडानं खडा सर्व काही सांगितलं. 

कल्याण अटोळे सांगतात त्या वेळी सकाळचे 8.30 वाजले असतील. विमान घिरच्या घालत होते. त्यामुळे ते विमान अजित पवारांचेच असेल असे आम्हाला वाटले होते. विमानाने दोन घिरट्या घातल्या. दुसऱ्या वेळी ते विमान एका बाजूला पूर्ण पणे कललं होतं. ते खूप खाली आलं होतं. शिवाय नेहमी पेक्षा विमानाचा आवाज  कर्कश येत होता. हे थोडं आम्हा गावकऱ्यांना वेगळं वाटवं. त्यावेळी ते विमान गावच्या मंदिरावर कोसळतं की काय असं वाटलं. 

Advertisement

नक्की वाचा - Ajit Pawar: बारामतीत काय शिजतयं? शरद पवारांची, पार्थ , जय पवारांसोबत बैठक, रोहित पवारांची ही उपस्थितीत

पुढे जावून ते धावपट्टीच्या खाली कोसळले. आम्ही त्यावेळी जाळ आणि धुर पाहीला. कसला ही विलंब न करता आम्ही मोटरसायकल वरून अपघात स्थळी पोहोचलो. तिथे पोहोचलो त्यावेळी विमान पडलेलं होतं. विमानाच्या पुढच्या भागातून धुर येत होता. जाळ त्यावेळी मोठा नव्हता. विमानाच्या पुढे तीस ते चाळीस फुटावर एका माणूस मला पाय तुटलेल्या अवस्थेत दिसला. शिवाय एक जण खाली उतरतोय की काय असा भास ही झाला असं अटोळे यांनी सांगितलं. त्यावेळी मी पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण एकाने मला अडवले. मागे येण्यास सांगितले. 

नक्की वाचा -  Ajit Pawar Plane Crash: अपघाता आधीचा 'तो' व्हिडीओ आला समोर, हात जोडून अजित पवार काय म्हणाले होते?

स्फोट होईल असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी मागे हटलो. काही वेळात खरोखर तिथे मोठा स्फोट झाला असं अटोळे यांनी सांगितलं. विमानाचे पार्ट लांब पर्यंत पसरले होते. त्यातले पेट्रोल ही उडाले होते. त्यावेळी तिथे एक माणूस पडला होता. त्याने निळी पॅट घातली होती. विमानाच्या डाव्या बाजूला अजित पवार पडले होते. आम्ही त्यांना ओळखलं. गावातल्या काही लोकांनी तातडीने चादरी आणल्या. अजित दावांवर त्या टाकण्यात आल्या. त्यातून गुंडाळूनच मग त्यांना रुग्णवाहीकेत ठेवण्यात आले.

नक्की वाचा -  Nashik News: मोठा उलटफेर! कल्याणनंतर आता नाशिकमध्ये ही 'मनसे' निर्णय, समिकरण बदलणार?

पण ते अजित दादाच आहेत यावर आमचा विश्वास बसत नव्हता. आम्हाला ते खरचं वाटत नव्हतं. पण शेवटी ते अजित दादाच असल्याचं स्पष्ट झालं. सर्वच जण स्तब्ध झाले. दादांच्या हातावर त्यावेळी घड्याळ होते. ते आम्ही पाहीले होते. नंतर पोलीस आले. दादांच्या पायातून धुर येत होता. तो पुठ्ठ्याने विझवण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. काहींनी पाणी टाकले. विमानाच्या बाहेर दोन मृतदेह होते. तर तिन जण विमानातच होते. त्यांचा पुर्ण कोळसा झाला होता असं ही त्यांनी सांगितलं.  

Advertisement