10 minutes ago

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज (31 जानेवारी) महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सूत्रांनी शुक्रवारी (30 जानेवारी) दिली. राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार या पहिल्या महिला ठरणार आहेत. बारामती येथे 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भातील निर्णयास सुनेत्रा पवार यांनी सहमती दर्शवल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांना देण्यात आली. त्यानुसार सुनेत्रा पवार यांचा आज संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Jan 31, 2026 14:28 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates:सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमताने निवड

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड

Jan 31, 2026 14:22 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड

  • सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड
  • दिलीप वळसे-पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला
  • छगन भुजबळ यांच्याकडून प्रस्तावाला अनुमोदन

Jan 31, 2026 13:53 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विधान भवनात दाखल 

Jan 31, 2026 13:46 (IST)

Sanjay Shirsat On Maharashtra Politics: माणसापेक्षा खुर्चीला महत्त्व : संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री

Advertisement
Jan 31, 2026 13:45 (IST)

NCP Merger News: दोन्ही पक्ष एकत्र राहावे अशी दादांची इच्छा होती: राजेश टोपे, नेते राशप

Jan 31, 2026 13:41 (IST)

Vidip Jadhav: अजित पवारांचे PSO विदीप जाधवांच्या कुटुंबीयांची माजी मंत्री अनिल देशमुख भेट घेणार

Advertisement
Jan 31, 2026 13:34 (IST)

Ajit Pawar News: ...हा विचारांचा वारसा आम्ही पुढे चालवू!, रुपाली चाकणकरांची खास पोस्ट

Jan 31, 2026 13:32 (IST)

Jayant Patil on NCP Merger Was Set for Feb 12 Ajit Pawar Wanted Unity Under Sharad Pawar's Guidance

NCP Merger : जयंत पाटील यांनी सांगितले की, "दादा आणि माझ्यामध्ये किमान 8-10 वेळा सविस्तर चर्चा झाली होती. बैठकीचे ठिकाण माझे घरच असायचे. पहिल्या दोन-तीन बैठकांमध्ये दादांनी साहेबांबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement
Jan 31, 2026 13:20 (IST)

Ajit Pawar: रोहित पवारांची अजित पवारांसाठी खास पोस्ट

Jan 31, 2026 13:15 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक दुपारी 2 वाजता पार पडेल: सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की," राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक दुपारी 2 वाजता पार पडेल. आमदार, जनतेची भावना लक्षात घेता सुनेत्रा वहिनींची गटनेतेपदी निवड होणे अपेक्षित आहे. ते झाल्यानंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष म्हणून देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतली. बैठकीचा व्हिडीओ दाखवला जात आहे, तो बारामती कृषिप्रदर्शानाच्या दिवशी चहापानाची व्हिडीओ आहे. त्यानंतर अजितदादांनी पत्रकार परिषद घेतला होती. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्याबाबत चर्चा झाल्याची माहिती अजितदादांनी दिली होती. जनभावना लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस परिवार, आमदार, नेते आम्ही सामूहिक हा निर्णय घेतला आहे. अजितदादा आमच्यात नाहीत हे दु:ख आम्ही पचवू शकत नाही. त्यांचे अस्थिकलश आम्ही महाराष्ट्राच्या गावागावात नेणार आहोत. महाराष्ट्र आपला मानून, महाराष्ट्राचा विकास करण्याचं त्यांचं नेतृत्व विलक्षण राहिलं."

Jan 31, 2026 12:35 (IST)

Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य

Jan 31, 2026 12:33 (IST)

Ajit Pawar News: युगेंद्र पवार यांची अजित पवार यांच्यासाठी भावुक पोस्ट

Jan 31, 2026 12:29 (IST)

Ambadas Danve | "खुर्ची संरक्षणासाठी आणि स्वार्थासाठी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची घाई" - दानवे

Jan 31, 2026 12:28 (IST)

Jayant Patil on NCP Merger राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या बैठकांबाबत जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

Jan 31, 2026 12:26 (IST)

Sharad Pawar 3 Major Statements on NCP Merger Uncertainty Over Sunetra Pawar's Swearing-in Ceremony

Sharad Pawar PC: सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांवर शरद पवार यांनी म्हटलं की, "मला या शपथविधीबाबत काहीही माहिती नाही. मी सध्या बारामतीत आहे.

Jan 31, 2026 12:23 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: पार्थ पवार बारामतीमध्येच थांबणार आहेत

पार्थ पवार बारामतीमध्येच थांबणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर जे भेटण्यास येतात, त्यांच्या भेटीसाठी बारामतीत थांबण्याचा निर्णय घेतला. जय पवार हे सुनित्रा पवारांसोबत गटनेता निवड आणि शपथविधी सोहळ्यासाठी असणार आहेत. 

Jan 31, 2026 12:19 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: आगामी निवडणुकीची जबाबदारी सुनेत्रा पवारांवर असेल: अनिल पाटील, आमदार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया

- दुसऱ्या पक्षानं काय बोलावे, हा मुद्दा नाही. हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे.

- आगामी निवडणुकीची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर असेल 

- शरद पवारांसोबत बोलणं झालं की नाही? याबाबत माहिती नाही 

- काळाची गरज असल्याने नेत्याची गरज आहे 

- कोणत्याही खात्याची जबाबदारी देण्यासाठीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, नेतेपदाची निवड आज होईल

- पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, चांगले आहे.

Jan 31, 2026 12:10 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली

Jan 31, 2026 12:08 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आज होईल: छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सांगितलं की, "लोकांचे, आमदारांचे मत विचारात घेतले तर सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधीमंडळातील नेत्या (CLP) आणि उपमुख्यमंत्री करणं हे योग्य राहील. त्याची फॉर्मेलिटी आज दुपारी करू. मुख्यंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे, ते सहकार्य करत आहेत. आजच राज्यपालांना सांगून शपथविधी होईल. 

शरद पवारांना शपथविधीबाबात माहिती नाही, याबाबत प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की, "मला या प्रश्नावर काही बोलायचे नाही. सीएलपी मीटिंगसाठी पत्र लवकर निघावे, यासाठी माझा प्रयत्न होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेलं सर्वात मोठं पद हे राज्याचे उपमुख्यमंत्रिपद आहे. ती सूत्रे सुनेत्राताईंच्या हाती देणं हे गरजेचं होतं".

आमच्या दृष्टीने पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपद जिथे सर्व शक्ती एकवटलेली आहे. पक्ष मजबूत करून पुढे नेण्याची शक्ती त्या पदामध्ये आहे. त्यावर आमचे पूर्णपणे लक्ष आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुढील निर्णय घेतले जातील, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहेत.

Jan 31, 2026 11:57 (IST)

NCP Merger News: राष्ट्रवादी विलीनीकरण बैठकांसंदर्भात जयंत पाटील यांचा मोठा दावा

राशपचे नेते जयंत पाटील यांचा मोठा दावा

- दादांशी माझी किमान 8-10 वेळा चर्चा झाली होती. 'साहेबांच्या देखत दोन्ही पक्ष एकत्र करायचे आहे आणि माझ्याबद्दलची जनमानसातील भावना पुसून पुन्हा साहेबांच्या पक्षासोबत एकत्रित यायचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते'. बैठकीचे ठिकाण माझे घरच होते, पहिल्या दोन-तीन बैठकांमध्ये साहेबांबद्दलच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या. साहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, साहेबांच्या बरोबर जे झालं ते विसरू आणि हा कालखंड मागे टाकून पुन्हा एक होऊ, राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ करू अशी त्यांची तीव्र भावना होती. 16 जानेवारी दादांची आणि आमच्या पक्षातील काही लोकांची बैठक झाली. 16 जानेवारीला सगळेच एकत्रित जमलो आणि तेव्हा ठरलं की जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढवू आणि निकाल लागल्यानंतर एकत्रिकरण जाहीर करून. अजित पवारांचे म्हणणे होते की 8 फेब्रुवारीला याची घोषणा करू, मात्र मी त्यांना सांगितले की दिल्लीला एक लग्न आहे, त्यामुळे 8-9 फेब्रुवारी नको. 12 फेब्रुवारी तारीख त्यासाठी ठरली होती. दुसऱ्या दिवशी पवार साहेबांसमोर बसलो आणि तिथे सविस्तर चर्चा झाली, 12 फेब्रुवारी सर्वांनी निश्चित केली. 

 - सत्तेमध्ये जाण्यासंदर्भात विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, "आधी दोन्ही पक्ष एकत्र करायचे याबद्दलचा अजित पवारांचा आग्रह होता, त्यात बरेच तपशील आहे. इथे ते सगळे सविस्तर सांगता येणं कठीण आहे. सुप्रिया ताईंना काहीवेळा चर्चेत आणायचाही मी प्रयत्न केला होता. अजित पवारांनी मला हे सांगितलं होतं की प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि अन्य लोकांनाही याबाबतची कल्पना दिली आहे. मी जो निर्णय घेईन तो या सर्वांना मान्य असेल".

- त्यांचा पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचे निर्णय हे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे काही प्रमाणात छगन भुजबळ घेत आहेत हे दिसतंय. त्या तिघांचा निर्णय जो असेल त्याची अंमलबजावणी होत असेल. त्यांच्या पक्षाबद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही.

Jan 31, 2026 11:51 (IST)

Sharad Pawar: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत काहीही माहिती नाही: शरद पवार

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबाबत काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीय. शपथविधीबाबत काहीही माहिती नाही. मीडियाद्वारे याबाबतची माहिती मिळाली. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार) घेतलाय. अजित पवार हे दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते आणि त्याबद्दल ते आशावादी होते. त्यांची इच्छा पूर्ण करावी. याची घोषणा होणार होती. पण त्यापूर्वीच अजित आम्हाला सोडून गेले, असे शरद पवार म्हणाले.

Jan 31, 2026 11:45 (IST)

Supriya Sule: सुप्रिया सुळे दुपारी नवी दिल्लीला रवाना होणार

राशप खासदार सुप्रिया सुळे दुपारी नवी दिल्लीला रवाना होणार

Jan 31, 2026 11:42 (IST)

Sharad Pawar: शरद पवार मुंबईसाठी दुपारी रवाना होणार

शरद पवार बारामतीतून मुंबईसाठी दुपारी रवाना होणार आहेत.

Jan 31, 2026 11:40 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल

  • बारामतीच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार दाखल
  • पार्थ पवार गोविंद बागेमध्ये दाखल

Jan 31, 2026 10:31 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदासंदर्भातील महत्त्वाची माहिती

  • सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्या सूचनेनंतरच सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या - सूत्र 
  • अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्ष विलिनीकरणाचा सूर आळवण्यात आला, त्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबाकडून तातडीने उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती

Jan 31, 2026 10:27 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live:सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा इतक्या घाईने करण्यामागे हे आहे कारण

  • सुनेत्रा पवार यांच्या गटनेता निवड आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस कोअर टीमचाच 
  • दोन एनसीपी एकत्रीकरण चर्चा मुद्दाम काहीजण घडवू पाहत असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली-सूत्र 
  • एनसीपी कोअर टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्‍यांची भेट घेत शपथविधी लवकर करण्याची भूमिका-सूत्र 
  • सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणे आणि एनसीपी पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल पटेल, सुनील तटकरे,छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्याच भूमिकेतून - सूत्र

Jan 31, 2026 10:23 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी

  • महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा होणार 
  • साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा होणार
  • अजित पवार यांचे निकटवर्तीय प्रमोद हिंदुराव देवगिरी बंगल्यावर दाखल 
  • शपथविधीसाठी राज्यशिष्टाचार विभागाकडून निमंत्रण पत्रिका पाठवल्या जात आहेत 
  • मंत्री, मुख्य सचिव तसंच डीजी यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थितीत राहणार

Jan 31, 2026 10:12 (IST)

Sanjay Raut: दुखवटा संपत नाही तोवर काहीही बोलणार नाही: संजय राऊत

संजय राऊत, नेते, शिवसेना(उबाठा) यांची पत्रकार परिषद

- जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपत नाही, तोपर्यंत आम्ही राजकीय विषयावर बोलणार नाही. बोलण्यासारखे भरपूर आहे, मात्र बोलणार नाही

- भाजप हा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे

-भाजपच्या भूमिका ठरतील त्यानुसार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे भविष्य ठरेल
 

Jan 31, 2026 10:01 (IST)

Sharad Pawar-Ajit Pawar: शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठकीचा व्हिडीओ

शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये 17 जानेवारी रोजी बैठक झाली होती. 

12 फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष विलीनीकरणाची घोषणा करतील, असे ठरले होते.

Jan 31, 2026 09:50 (IST)

Sharad Pawar: शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक

शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या पक्षातील सदस्यांची बैठक

शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रोहित पवार,संदीप क्षीरसागर यांच्यात चर्चा झाल्याची माहिती. 

Jan 31, 2026 09:20 (IST)

Sharad Pawar: शपथविधी सोहळा आणि पक्ष विलीनीकरणाबाबत शरद पवार काय म्हणाले, ऐका संपूर्ण पत्रकार परिषद

Jan 31, 2026 09:08 (IST)

Sharad Pawar: सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत काही माहिती नाही: शरद पवार

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच शरद पवार म्हणाले की,  शपथविधीसोहळ्याबाबत काहीही माहिती नाही. मी तर इथे (बारामतीत) आहे, मग कसा जाणार?

Jan 31, 2026 08:54 (IST)

Sharad Pawar: पक्ष विलीनीकरणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादी विलीनीकरणावर 4 महिन्यांपूर्वी चर्चा, पण आता खंड पडला: शरद पवार

Jan 31, 2026 08:42 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: अजित पवार एक कर्तृत्ववान नेते होते: शरद पवार

शरद पवार यांची पत्रकार परिषद

- अजित पवार एक कर्तृत्ववान नेते होते

- लोकांच्या प्रश्नावर सखोल माहिती घ्यायची आणि लोकांना न्याय देता येईल, अशा प्रकारचं काम करायचे.

- त्याच्या कामाची सुरुवात सकाळी 6-7 वाजेपासून व्हायची

- आता जी वेळ आपण पाहतोय. जर आज ते हयात असते तर ते इथे दिसले नसते फिल्डवर दिसले असते.

-कर्तृत्ववान व्यक्ती सोडून जाते, हा प्रचंड मोठा आघात आहे. या परिस्थितीला सामोरे तर जावे लागेल, लोकांचं दुःख कमी करण्यासाठी बाहेर निघावं लागेल, त्यांची जी काम करण्याची पद्धत होती ती सुरू ठेवावी लागेल. नव्या पिढीला या आव्हाना सामोरे जावं लागेल

Jan 31, 2026 08:34 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: सुनेत्रा पवार यांना 6 महिन्यांत आमदार व्हावे लागणार

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर सुनेत्रा पवार यांना 6 महिन्यांत आमदार व्हावे लागणार 

एखादी व्यक्ती विधानसभा, विधानपरिषद सदस्य नसतानाही मंत्री होऊ शकते

पण संबंधित व्यक्तीला 6 महिन्यांच्या आत आमदार किंवा विधानपरिषद सदस्य व्हावे लागते

6 महिन्यांत निवडून न आल्यास मंत्रिपद आपोआप रद्द होते

हा नियम केंद्र (कलम 75(5)) आणि राज्य दोन्हीकडे लागू आहे

Jan 31, 2026 08:00 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: सुनेत्रा पवार यांचा आजचा दौरा

  • सकाळपासून ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत देवगिरी बंगला येथे असणार. 
  • एनसीपी आमदार आणि अन्य नेतेमंडळींच्या भेट घेणार. 
  • एनसीपी कोअर टीमची देवगिरी बंगला येथे सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे.
  • दुपारी 1.30 वाजता विधानभवनाकडे निघणार.
  • विधानभवनात दुपारी 2 वाजता एनसीपी विधीमंडळ बैठकीस हजर राहतील.
  • संध्याकाळी 4.30 वाजता राजभवनाकडे शपथविधी सोहळ्यासाठी दाखल होतील.

Jan 31, 2026 07:48 (IST)

Maharashtra News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेरील दृश्य

Jan 31, 2026 07:01 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates:सुनेत्रा पवार यांना कोणती खाती मिळणार?

सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा यासह अन्य एखादे अतिरिक्त खाते एनसीपीकडे देण्याची शक्यता

Jan 31, 2026 06:58 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेऊन आम्ही त्यास साथ देऊ: CM देवेंद्र फडणवीस

Jan 31, 2026 06:56 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: सुनेत्रा पवार मुंबईमध्ये दाखल

Jan 31, 2026 06:55 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी

सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Jan 31, 2026 06:55 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live Updates: आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी

सुनेत्रा पवार आज संध्याकाळी 5 वाजता घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

Jan 31, 2026 06:27 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक

महाराष्ट्र विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य यांची आज दुपारी 2 वाजता बैठक पार पडणार आहे.

Jan 31, 2026 06:23 (IST)

Sunetra Pawar Oath Ceremony Live: सुनेत्रा पवार मुंबईतील निवासस्थानी पोहोचल्या