Akola News: लाच मागितली, मग नाकारली; तरीही बडा अधिकारी अडकलाच

अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins
Nayab Tehsildar Booked for Demanding Bribe: पातूर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय.
अकोला:

Nayab Tehsildar Booked for Demanding Bribe: अकोल्यातील एका बड्या अधिकाऱ्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम चव्हाण (Nayab Tehsildar Booked for Demanding Bribe)असं या अधिकाऱ्याचे नाव असून ते पातूर इथे नायब तहसीलदार म्हणून काम करतात. शेतीचे हद्दी खुणा कायम करण्याचे काम घेऊन तक्रारदार चव्हाण यांच्याकडे आला होता. हे काम करण्यासाठी चव्हाण यांनी तक्रारदाराकडे 4 हजार रुपयांची  लाच मागितली होती असा तक्रारदाराने आरोप केला आहे. 

(नक्की वाचा : आधी प्रेम, मग शोषण, अश्लील फोटो ही काढले, अल्पवयीन तरुणी बरोबर भयंकर घडलं)

कसा रचला एसीबीने सापळा?

11 जून रोजी तक्रारदाराने अकोल्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. शेतीच्या हद्दी खुणा कायम करण्यासाठी चव्हाण यांनी आपल्याकडे 4 हजार रुपये मागितल्याचे तक्रारदाराने म्हटले होते. 12जून रोजी एसीबीने पडताळणी कारवाई केली होती. यावेळी  बळीराम चव्हाण यांनी तक्रारदाराकडे 4 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. चव्हाण यांच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या अन्य एका व्यक्तीनेही तक्रारदाराला लाच देण्यास सांगितले होते. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचला होता. (Anti Corruption Bureau Trap) तक्रारदाराने लाच देण्याचा प्रयत्न केला तेव्हा चव्हाण यांनी ती घेण्यास टाळाटाळ केली होती. 

Advertisement

(नक्की वाचा : मद्यधुंद गुंडाचा हैदोस, तरुणावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक)

लाच स्वीकारण्यास नकार, तरीही अधिकारी कसा अडकला?

काहीतरी गडबड आहे हे कळाल्याने चव्हाण यांनी लाचेची रक्कम घेण्यास नकार दिल्याचा संशय एसीबीला असून चव्हाण यापुढे तक्रारदाराकडून लाचेच्या रकमेची मागणी करणार नाहीत किंवा त्यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारणार नाहीत असे एसीबीने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. एसीबीने चव्हाण (Nayab Tehsildar Booked for Demanding Bribe) आणि त्यांच्या कार्यालयातील लाच देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्या विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Advertisement

ही कारवाई मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, एसीबी, अमरावती,  सचिंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक एसीबी, अमरावती व  मिलींदकुमार अ. बहाकर पोलीस उपअधीक्षक एसीबी, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  अतुल इंगोले,  प्रविण वेरूळकर, पोलीस अंमलदार प्रदीप गावंडे, संदीप ताले, डिगांबर जाधव, निलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार, असलम व चालक सलीम खान, चालक नफीस खान यांनी केली.
 

Advertisement
Topics mentioned in this article