Akola News: बार्शीटाकळीत संताप! 'या' सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांसमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्..प्रकरण काय?

कोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये रस्ते व पाणी समस्येवरून नागरिकांचा संताप उसळला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Akola Social Worker Self Immolation News

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Self Immolation Case : अकोल्याच्या बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये रस्ते व पाणी समस्येवरून नागरिकांचा संताप उसळला आहे. या परिसरात सुरू असलेल्या रस्तेकामात अनियमितता झाल्याचा तसेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या कामासंदर्भातील कागदपत्रे आणि मंजुरीची माहिती मिळावी म्हणून आठ ते नऊ महिन्यांपूर्वी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज दाखल केला होता.

मात्र अद्याप संबंधित माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.याच पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवकांनी कोणतीही माहिती सार्वजनिक न करता रस्ते काम सुरू केल्याचा आरोप करत नागरिकांनी कामासाठी आणलेला मुरूम आणि जेसीबीचे काम रोखले.माहिती अधिकारांतर्गत संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिल्यानंतरच विकासकामे सुरू करावीत,अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली.

Advertisement

नक्की वाचा >> Satara News : सातारा-पुसेगाव मार्गावर फॉर्च्युनर आणि बोलेरोची समोरासमोर धडक, 10 वारकरी महिलांसोबत भयंकर घडलं

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,पोलिसांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

या प्रकरणात न्याय मिळावा आणि कामाची चौकशी व्हावी,यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केल्याचे सांगितले.मात्र,त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ते सम्राट ढोले यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.उपस्थित पोलिसांनी आणि नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकारामुळे बार्शीटाकळीतील विकासकामे,त्यातील पारदर्शकता आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नक्की वाचा >> Kolhapur News: भाजप कार्यकर्ता गोळीबार प्रकरण! रफिक मुल्ला, शहाबाज मुल्लाला पकडलं, पोलिसांना मिळाली आतली खबर

भ्रष्टाचाराचे आरोप;,प्रशासनाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही

सामाजिक कार्यकर्ते सम्राट ढोले यांनी रस्ते कामात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत,याच कारणामुळे माहिती अधिकारांतर्गत मागविलेली माहिती जाणूनबुजून दिली जात नसल्याचा दावा केला आहे.जोपर्यंत संपूर्ण माहिती जाहीर होत नाही आणि दोषींवर कारवाई केली जात नाही,तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

दुसरीकडे,या सर्व आरोपांबाबत बार्शीटाकळी नगरपंचायत प्रशासन किंवा संबंधित लोकप्रतिनिधींची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती आणि आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार असून, या संपूर्ण प्रकरणाकडे बार्शीटाकळीसह अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement