Ambernath News: अंबरनाथमध्ये मोठा ट्विस्ट! निवडणूक स्थगितीवरून शिवसेना आक्रमक; पण भाजपानं दाखवलं 'ते' पत्र

Ambernath Election Postponed: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष थेट आमनेसामने आले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ambernath Election Postponed: अंबरनाथमध्ये सत्तारुढ शिवसेना-भाजपामधील वाद चांगलाच तीव्र झाला आहे.
मुंबई:

Ambernath Election Postponed: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून आता शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) हे दोन्ही सत्ताधारी पक्ष थेट आमनेसामने आले आहेत. निवडणूक आयोगावर टीका करत शिवसेनेने (शिंदे गट) आंदोलन केले होते. तर भाजपाने शिवसेनेच्या एका उमेदवारावरच निवडणूक लांबणीवर टाकल्याचा पलटवार केला आहे.

शिवसेनेचे आक्रमक आंदोलन

अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार होती, ती अचानक स्थगित करून 20 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली. ही निवडणूक स्थगित झाल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली.

सोमवारी सकाळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, आमदार बालाजी किणीकर, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आणि उमेदवारांसह अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात धडक दिली.

( नक्की वाचा : Local Body Elections: तुमच्या नगरपालिकेचे मतदान दोनदा होणार? 'या' कारणामुळे आयोगाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर )
 

कोणताही ठोस आधार नसताना निवडणूक का रद्द करण्यात आली, असा सवाल त्यांनी केला. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी काम करत आहे असा आरोप करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. निवडणूक आयोगाकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर नाव न घेता टीका केली.

Advertisement

भाजपाचा जोरदार पलटवार

शिवसेनेच्या या आंदोलनानंतर आणि टीकेनंतर भाजपने तातडीने पलटवार केला आहे. भाजपने थेट शिवसेनेच्याच एका उमेदवाराला या निवडणूक स्थगितीसाठी जबाबदार धरले आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी याबाबत माहिती देताना स्पष्ट केले की, निवडणूक रद्द होणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. मात्र, कोणामुळे या निवडणुका पुढे गेल्या, हा मूळ प्रश्न आहे.

शिवसेना सत्तेमध्ये सहभागी आहे आणि नगरविकास खाते त्यांच्याकडे आहे. शिवसेना नेते राजेंद्र वाळेकर यांच्या पत्नीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता.त्यांनी जी रिट पिटीशन (Writ Petition) दाखल केली, त्या पिटीशनच्या निकालाला उशिर झाल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे, असा दावा सूर्यवंशी यांनी केला.

Advertisement

( नक्की वाचा : Kalyan News : कल्याणमध्ये सत्तेच्या बळावर गुन्हेगारी; तरुणीवर अत्याचार करणारा राजकीय कार्यकर्ता अखेर जेरबंद )
 

त्यांना उमेदवारी अर्ज मागेच घ्यायचा होता, तर त्यांनी पिटीशन दाखल कशासाठी केली? कुठेतरी राजकीय हेतूने अर्ज भरून त्यानंतर पिटीशन दाखल केली गेली आणि पिटीशनच्या निकालास झालेल्या उशिरामुळे निवडणूक लांबणीवर गेली. ही पिटीशनच जबाबदार असून, ज्यांनी ती दाखल केली तेच या निवडणुका लांबणीवर जाण्यास जबाबदार आहेत, असा थेट आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे.

एकंदरीत, अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीच्या स्थगितीवरून सत्ताधारी युतीतील दोन्ही पक्ष आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.