अंबरनाथ हादरले! सिमरन पाटील आत्महत्या प्रकरणात खळबळजनक माहिती समोर, बड्या व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

Ambarnath News: अंबरनाथच्या S3 पार्क हॉटेलमध्ये सिमरन पाटील या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. व्यावसायिक प्रियकर भगवान लोटे हा सिमरनवर अवैध मनी लाँड्रिंग करण्यासाठी दबाव टाकत होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ambarnath News: अंबरनाथ येथील S3 पार्क हॉटेलमध्ये 10 एप्रिल रोजी सिमरन पाटील या तरुणीने केलेल्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी प्रसिद्ध व्यावसायिक भगवान लोटे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सिमरनला अवैध कामात ओढण्याचा प्रयत्न लोटे करत होता, असे तपासात समोर येत आहे.

काय आहे मुख्य कारण?

सिमरन पाटील ही भगवान लोटेच्या कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होती. यादरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, लोटे तिच्या पदाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून अवैध मनी लाँड्रिंगची कामे करून घेत होता. सिमरनला हे अवैध काम सोडण्याची इच्छा होती. तिने वारंवार काम सोडण्याबाबत सांगितले होते, मात्र लोटे तिच्यावर सातत्याने दबाव टाकत होता.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

10 एप्रिल रोजी लोटेने सिमरनला S3 पार्क हॉटेलच्या रूम नंबर 310 मध्ये बोलावले. तिथे कॉल, चॅटिंग आणि प्रत्यक्ष संवादातून त्यांच्यात मोठा वाद झाला. लोटेने तिला दिलेल्या मानसिक त्रासामुळे तिने आत्महत्येचे पाऊल उचलले, असा आरोप एफआयआर (FIR) मध्ये करण्यात आला आहे.

लोटेविरोधात गुन्हा दाखल

भगवान लोटे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गंभीर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा असल्याने लोटेच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी सिमरनचा मोबाईल आणि चॅटिंगचे रेकॉर्ड्स तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

(नक्की वाचा-  Pune News: रिंग रोडसाठी शेतकरी कुटुंबाला रस्त्यावर आणलं; डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त)

"सिमरनच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आणि प्राथमिक तपासातील पुराव्यांच्या आधारे भगवान लोटे विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल," अशी माहिती अंबरनाथ पोलिसानी दिली. 
 

Topics mentioned in this article