सुरज कसबे, पिंपरी चिंचवड
Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प परिसरात धर्मांतराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी एका अमेरिकन नागरिकाला आणि भारतीय वंशाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्यावर लोकांना ख्रिश्चन धर्मात येण्यासाठी प्रलोभने दिल्याचा आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी कॅम्प येथे आरोपींनी लोकांना 'येशूलाच देव माना, इतर कुठलेही देव नाहीत. ख्रिचन धर्मात प्रवेश केल्यास सुख, समृद्धी लाभेल,' असे सांगून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपींना ताब्यात घेतले.
(नक्की वाचा- Latur Crime News: मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारल्याने बायकोला जाळले, लातूरमधील भयंकर प्रकार)
या प्रकरणात शेफर जाविन जेकॉब आणि स्टीव्हन विजय कदम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासोबतच या प्रकारात एका १६ वर्षीय बालकाचाही समावेश होता. मात्र, पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिले आहे.
अटक करण्यात आलेला शेफर जाविन जेकॉब हा मूळचा अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. तो एका वर्षाच्या व्हिसावर भारतात आला होता. भारतात येऊन अशा प्रकारे धर्मांतराचा प्रयत्न केल्याने त्याच्या हेतूंबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
(नक्की वाचा- Crime News: जेवणात विष घातलं, 3 चिमुकल्या लेकींना आईनेच संपवलं, भयंकर कारण आलं समोर)
या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला आहे. धर्मांतर विरोधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. अशा घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.