राज्यभरात सुरू असलेल्या भरारी पथकांच्या कारवाईत सोने आणि चांदीच्या वस्तू मोठ्या प्रमाणात पकडल्या जात आहेत. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अचारसंहीता असल्याने ही कारवाई केली जात आहे. नोंदणीकृत सराफा व्यापाऱ्यांना ज्यांच्या राज्यभरात अनेक शाखा आहेत, अशा व्यापाऱ्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात सोन्या-चांदीची वाहतूक करण्याची मुभा दिलेली आहे. त्यासाठी इन्व्हाईस किंवा जीएसटीची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार केलेली चलने वैध मानली जातात. पण असं असतानाही कारवाई केली जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
परंतु याविषयीची कल्पना शहरा- शहराच्या वेशीवर सध्या तैनात असणाऱ्या भरारी पथकांमधील पोलीस आणि इतर महसूल कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे अनेकदा विशेषतः सोन्या-चांदीच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यांच्या गाड्या पकडल्या जातात. त्यातून अवैध वाहतूक होत असल्याचा प्रथमदर्शनी भास निर्माण केला जातो. पण जर लॉजिस्टिक कंपन्या अशाप्रकारे सुरक्षित वाहतूक यंत्रणा पुरवतात अशांच्या गाड्यांमधून सोने चांदी पकडली गेल्यास, तो आचारसंहिता भंग असल्याची माहिती पुरवणे हे चुकीचे आहे. तशा बातम्या सध्या पसरवल्या जात आहे असा सराफा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच
राज्यभरातील सराफा व्यापारी अशा कारवायांमुळे त्रस्त असल्याची भावना इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक अमित मोडक यांनी एनडीटीव्हीसी बोलताना व्यक्त केली आहे. नागपूरहून अमरावतीला जाणाऱ्या एका सुरक्षित लॉजिस्टिक व्यवस्था देणाऱ्या कंपनीच्या गाडीतून सुमारे साडेचौदा कोटी रुपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. अशा घटना मुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशी तक्रारही अमित मोडक यांनी एनडीटीव्ही शी बोलताना केली आहे. अशा कारवाया टाळाव्यात अशी मागणी ही केली आहे.