अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात साचलं पाणी, भगवान महादेवाला जलाभिषेक

प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
अंबरनाथ:

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी साचलं आहे. मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या वालधुनी नदीला पूर आल्यामुळे गाभाऱ्यात गुडघाभर पाणी साचलं असून त्यामुळे भगवान भोलेनाथाला जलाभिषेक झाल्याचं म्हटलं जात आहे. 

प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरल्यामुळे भाविकांसाठी गाभारा बंद करण्यात आला असून गाभाऱ्यातील भगवान भोलेनाथाचा मुखवटा गाभाऱ्याच्या बाहेर काढून ठेवण्यात आला आहे. या मुखवट्याचं दर्शन आणि पूजा सध्या भाविक करत आहेत. पाणी ओसरेपर्यंत कुणालाही गाभाऱ्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचं पुजाऱ्यांनी सांगितलं आहे. दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर वालधुनी नदीचा प्रवाह वाढत असल्यामुळे प्राचीन शिवमंदिराच्या गाभाऱ्यात अशाप्रकारे पाणी साचून भगवान भोलेनाथाला जलाभिषेक होत असतो. 

नक्की वाचा - Live Update : पुण्यात 'जल'कल्लोळ, वाहनं पाण्याखाली, शाळांना सुट्टी; इतर जिल्ह्यांमध्ये काय आहे स्थिती?

कल्याण मलंग रस्त्यावरील द्वारली गावाजवळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या भागात शाळा असल्याने विद्यार्थ्यांची बस, रिक्षा देखील वाहतूक कोंडीत अडकली आहे. रस्त्यावर खड्डे आणि त्याशिवाय साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 

पुणे, मुंबई तसेच राज्यातील इतरही भागात असलेल्या पावसाच्या स्थितीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पुण्यात एनडीआरएफच्या 2 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एकतानगर भागात 11 बोटींनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापनातील  सर्व चमूंना सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असेही आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Advertisement