Anjali Damania : धनंजय मुंडेंवर 245 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, अंजली दमानियांनी पुरावेच सादर केले

Anjali Damania PC : राज्यातील सोयाबिन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकार योजना सुरु केला होती. या योजनेतील नियमांना दाब्यांवर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना कोट्यवधींचा घोटाला केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Anjali Damania Allegations on Dhananjay Munde : वाल्मिक कराड आणि गँगमुळे अडचणीत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. 'मी जे आरोप केले ते पुराव्यानिशी मी सगळं देणार'  असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. या योजनेतील नियमांना धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या योजनेत काही वस्तू खरेदी करायच्या आणि शेतकऱ्यांना द्यायच्या यासाठी एमएआयडीसीला या योजनेत सहभागी करण्यात आलं. यासाठी 12 मार्च 2024 आणि 15 मार्च 2024 असे दोन जीआर काढण्यात आले. 

(नक्की वाचा-  Marathi Language Policy : सरकारी कार्यालयांमध्ये आता मराठी भाषा अनिवार्य; राज्य सरकारचा मोठा निर्णय)

या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली. मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली. यामुळे कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आहे. 

Advertisement

वस्तूंची किती महाग खरेदी?

92 रुपयाला नॅनो युरियाची बाटली मिळते, ती 220 रुपयांना घेण्यात आली.  दुपटीपेक्षा जास्त किमतीने ही बाटली घेतली. नॅनो युरिया, नॅनो डीओबी यात जवळपास  88 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. 557 रुपयांची बॅग 1200 रुपयांना घेतली. 2400 रुपयांचा फवारणी पंप 3500 रुपयांना खरेदी केला. यासाठीच्या टेंडरची प्रक्रिया न करताच कच्चा माल विकत घेण्यासाठी पैसे देण्यात आले. जवळपास पावणे तीनशे कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 

(नक्की वाचा-  Sanjay Raut : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला का जात नाहीत? संजय राऊतांचा अजब दावा)

भगवानगडाने पाठिंबा काढावा

कृषीमंत्री श्रीमंत व्हावे, यासाठी हे केले गेले आहे. त्यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. आता तरी भगवानगडाने पाठिंबा काढून घ्यावा ही विनंती देखील अंजली दमानिया यांनी केली आहे. 

Advertisement

VIDEO पाहा