पुण्यातील प्रसिद्ध Ernst & Young कंपनीच्या एका 26 वर्षीय चार्टर्ड अकाऊंटन्ट (Chartered Accountant) अॅना सेबेस्टियन पेरायिलच्या (Anna Sebastian Perayil) मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. अॅना मूळची केरळची. देशभरातील वृत्तमाध्यमांकडून याची दखल घेतली जात आहे. 20 जुलै 2024 रोजी कामाच्या अतिभारामुळे अॅनाचा मृत्यू झाल्याच्या माध्यमांमधील वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) ने स्वत:हून घेतली आहे.
चार महिन्यांपूर्वी अॅना अर्न्स्ट अँड यंग कंपनीत रुजू झाली होती. तिच्या आईने कंपनीच्या प्रमुखांना पत्र लिहून दावा केला आहे की, उशीरापर्यंत काम केल्यामुळे त्यांच्या मुलीच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र कंपनीने हे आरोप फेटाळले आहेत. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय या प्रकरणाचा तपास करत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मानवाधिकार आयोगाने असं निरीक्षण नोंदवलं आहे की, माध्यमातील वृत्त जर खरं असेल तर युवा वर्गाला कामाच्या ठिकाणी भेडसावणारी आव्हाने, मानसिक तणाव, चिंता आणि झोप न लागणे, अव्यवहार्य टार्गेटचा पाठलाग करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यामुळे गंभीर समस्या उद्भवत आहेत. आणि कालांतराने त्यांच्या मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन होत आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित, संरक्षित आणि सकारात्मक वातावरण प्रदान करणे हे प्रत्येक नियोक्त्याचं (नोकरी देणारा) प्रमुख कर्तव्य आहे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाने आणि निष्पक्षतेने वागवले जाईल याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं.
नक्की वाचा - ऑफिसमधील अतिरिक्त ताणामुळे तरुणीचा मृत्यू? पुण्यातील प्रसिद्ध EY कंपनीवरील आरोपामुळे देशभरात खळबळ
व्यावसायिकांनी मानवी हक्कांच्या मुद्द्यांसाठी जबाबदारी घ्यायला हवी आणि जागतिक मानवी हक्क मानकांशी पाठिंबा सुनिश्चित करण्यासाठी त्यांचे कार्य आणि रोजगार धोरणे आणि नियम नियमितपणे अद्ययावत आणि दुरुस्त करायला हवे, यावर आयोगाने भर दिला.
त्यानुसार त्यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाला नोटीस बजावून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या तरुण कर्मचाऱ्याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणातील तपासाचा परिणाम देखील आयोगाला जाणून घ्यायचा आहे. याशिवाय, आयोगाला अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत आणि उचलली जाणार आहेत हे देखील जाणून घ्यायचे आहे. चार आठवड्यांमध्ये हा अहवाल अपेक्षित आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
18 सप्टेंबर 2024 रोजी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मृत मुलीच्या आईने दावा केला आहे की तिच्या मुलीचा मृत्यू मोठ्या कार्यसंस्कृतीचे प्रतिबिंब आहे, जे कठोर परिश्रमाचा आदर करते परंतु आरोग्याची किंमत मोजावी लागते. मूल्ये आणि मानवी हक्कांबाबत बोलणारी कंपनी आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी देखील उपस्थित राहू शकत नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world