Arattai vs WhatsApp: भारताच्या मेसेजिंग मार्केटमध्ये आता 'व्हॉट्सॲप' ला झोहो (Zoho) ने विकसित केलेल्या 'मेड इन इंडिया' अरट्टाई (Arattai) ॲपकडून मोठी टक्कर मिळत आहे. दोन्ही ॲप्स संपर्कासाठी उपयुक्त असले तरी, गोपनीयता (Privacy) आणि फीचर्स मध्ये मोठे फरक आहेत. अरट्टाई 'जाहिरात-मुक्त' आहे आणि यूजर डेटा जाहिरातींसाठी वापरला जात नाही, तर व्हॉट्सॲप सर्व संवादांसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुविधा (E2EE) देते. दोन्ही ॲप्समध्ये नेमके काय मोठे फरक आहेत आणि कशासाठी कोणते ॲप चांगले आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या
मल्टी-डिव्हाइस ॲक्सेस
अरट्टाई (Arattai): एकाच वेळी 5 उपकरणांवर वापरता येते, ज्यात Android TV चा समावेश आहे.
व्हॉट्सॲप (WhatsApp): सध्या Android TV ला सपोर्ट नाही.
'पॉकेट' फीचर
अरट्टाई (Arattai): एक खास 'सेल्फ-चॅट' जागा (Pocket) आहे, जिथे फोटो, व्हिडिओ, नोट्स आणि रिमाइंडर्स सुरक्षित ठेवता येतात.
व्हॉट्सॲप (WhatsApp): 'मेसेज युवरसेल्फ' ('Message Yourself') विंडोद्वारे सेल्फ-चॅटची सुविधा आहे.
मीटिंग्स' टॅब
अरट्टाई (Arattai): व्हिडिओ मीटिंग्ज शेड्यूल करण्यासाठी एक वेगळा 'Meetings' टॅब उपलब्ध आहे.
व्हॉट्सॲप (WhatsApp): मीटिंग्स शेड्यूल करण्यासाठी कोणतेही खास फीचर नाही.
( नक्की वाचा : Arattai ॲपचे वैशिष्ट्य काय? व्हॉट्सॲपला टक्कर देणाऱ्या 'स्वदेशी' ॲपबद्दलची A to Z माहिती इथं वाचा! )
ॲक्सेसिबिलिटी
अरट्टाई (Arattai): कमी मेमरी असलेल्या स्मार्टफोनवर आणि जुन्या 2G/3G नेटवर्कवरही सुरळीत कार्य करण्यासाठी 'लाईटवेट' डिझाइन केले आहे. व्हॉट्सॲप (WhatsApp): तुलनात्मकदृष्ट्या जास्त डेटा आणि सिस्टिम संसाधने वापरते.
चॅनेल आणि स्टोरीज
अरट्टाई (Arattai): प्रसारण-शैलीतील 'Channels' आणि 'Stories' (WhatsApp च्या Status प्रमाणे) सुविधा उपलब्ध.
व्हॉट्सॲप (WhatsApp): 'Status' आणि 'Channels' सारखी वैशिष्ट्ये आहेत.
ग्रुप चॅट मर्यादा
अरट्टाई (Arattai): साधारणपणे 1,000 सदस्यांची मर्यादा.
व्हॉट्सॲप (WhatsApp): 1,024 सदस्यांपर्यंतची मर्यादा.
वापरकर्तानाव (Username)
अरट्टाई (Arattai): मोबाईल नंबर न वापरता केवळ 'वापरकर्तानाव' (Username) वापरून चॅट करण्याची सुविधा.
व्हॉट्सॲप (WhatsApp): हे वैशिष्ट्य उपलब्ध नाही.
गोपनीयता आणि सुरक्षा (Privacy and Security) तुलना
डेटाचा वापर
अरट्टाई (Arattai): जाहिरातींसाठी वैयक्तिक डेटा वापरला जाणार नाही, तसेच तो तृतीय पक्षांना (Third Parties) विकला जाणार नाही, अशी Zoho ची माहिती.
व्हॉट्सॲप (WhatsApp): जाहिरात-मुक्त (Ad-Free) ॲप. Meta च्या धोरणानुसार, जाहिरातींसाठी डेटाचा वापर केला जाऊ शकतो.
डेटा सेंटर्स
अरट्टाई (Arattai): सर्व डेटा सेंटर्स भारतामध्ये स्टोअर केला आहे. ज्यामुळे 'स्थानिक डेटा व्यवस्थापन' (Local Data Management) ला महत्त्व दिले जाते.
व्हॉट्सॲप (WhatsApp): डेटा सेंटर्स जागतिक स्तरावर (Global) आहेत.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन (E2EE)
अरट्टाई (Arattai): सध्या केवळ व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्ससाठी संपूर्ण E2EE लागू आहे. टेक्स्ट मेसेजेससाठी E2EE लागू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
व्हॉट्सॲप (WhatsApp): चॅट्स, कॉल्स आणि सामायिक केलेल्या फाईल्ससह सर्व प्रकारच्या संवादासाठी E2EE लागू.
'अरट्टाई मेसेंजर' ॲप वापरण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य (Free) आहे. Zoho ने हे 'फ्रीवेअर' आणि 'क्रॉस-प्लॅटफॉर्म' ॲप्लिकेशन म्हणून विकसित केले आहे आणि ते जाहिरात-मुक्त ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, कंपनी वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाचा वापर लक्ष्यित जाहिरातींसाठी करणार नाही, हे Meta च्या धोरणापेक्षा वेगळे आहे.
'अरट्टाई' ॲप Android आणि iOS या दोन्ही उपकरणांसाठी उपलब्ध आहे. ते Google Play Store आणि Apple App Store वरून विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. मोबाईल व्यतिरिक्त, ते डेस्कटॉप सिस्टिम्स (Windows, macOS, Linux) आणि Android TV सह अनेक उपकरणांवर वापरले जाऊ शकते.